शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
4
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
5
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
6
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात साकारणार ‘राम शेवाळकर’ नाट्यगृह

By admin | Updated: June 11, 2014 23:01 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राम शेवाळकर नाट्यगृहासाठी नगरपरिषदेने दीड एक जागा आरक्षित केली असून पुढील कारवाईसाठी प्रस्ताव शासनदरबारी पाठविला जाणार आहे.

नरेंद्र जावरे - अचलपूर
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राम शेवाळकर नाट्यगृहासाठी नगरपरिषदेने दीड एक जागा आरक्षित केली असून पुढील कारवाईसाठी प्रस्ताव शासनदरबारी पाठविला जाणार आहे.
अचलपूर शहरातील थोर व्यक्तिमत्व, राज्यातील दिग्गज साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे राम शेवाळकर हे अमरावतीचे गौरव होते. त्यांच्या नावाने नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी अचलपूर नगरपरिषदेने एकमताने ठराव घेत दीड एकर जागा आरक्षित करून

तसा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे. नगराध्यक्ष अरूण वानखडे यांच्या पुढाकाराने या कार्याला गती आली. सदर ठरावाला नगरसेवक अभय माथने व नितीन डकरे यांनी समर्थन दिले. सूचक म्हणून रूपेश ढेपे व अनुमोदक म्हणून पवन बुंदेलेहे होते.

उपस्थित संपूर्ण तीस नगरसेवकांनी एकमताने नाट्यगृहाचा ठराव मंजूर केला.
या जागेचे आरक्षण
परतवाडा शहरातील उपविभागीय कार्यालयापुढील विकास योजनेत आरक्षण क्रमांक ४३, टाऊनहॉल व आरक्षण क्र. २९ बगिचा, तरणताल, दोन्ही आरक्षणामधील दक्षिण-पश्चिम कोपऱ्यातील ०.६७० हेक्टर जागा प्राचार्य राम शेवाळकर नाट्यगृहासाठी

आरक्षित करण्यात आली. विकास योजनेत तसा फेरबदल करण्याची मंजुरी अचलपूर नगरपालिकेने दिली आहे.
प्रस्ताव शासन दरबारी
राम शेवाळकर यांच्या नावे येथे नाट्यगृह व्हावे, यासाठी येथील सवई गंधर्व प्रतिष्ठानतर्फे सतत पाठपुरावा करण्यात आला. नगरपालिकेने त्यासाठी जागा आरक्षितकरून शासनाकडे विकास आराखड्यात फेरबदल करून वैधानिक कारवाईसाठी प्रस्ताव सादर

केला. त्यानंतर सदर जागेचे आरक्षण व नाट्यगृह उभारण्याची घोषणा शासन करेल.