शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पावसाची उसंत, बिजांकूर करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने ...

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने बिजांकुर करपायला लागले आहे. वाणी आदी कीटक कोवळ्या पिकांचा फडशा पाडत आहे. जमिनीतील आर्द्रता कमी होत असल्याने शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागल्याचे दृश्य शिवारांत दिसून येत आहे. दरम्यान मृगाच्या गाढवाने धोका दिल्याने आर्द्राचा कोल्हा तारणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

जिल्ह्यात वेळेआधी मान्सून पोहोचला असल्याच्या वार्तेने शेतकरी उत्साही होऊन बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली. संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणी कपाशी, सोयाबीनला पाणी देत आहेत. मात्र, जिरायती क्षेत्रात मात्र, निसर्गावर अवलंबून राहावे लागत असल्याने कोवळी पिके माना टाकत आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तुरळक पेरण्या झाल्या होत्या. आता पावसाची उसंत असतानाही शेतकरी रिस्क घेत आहे. साधारणपणे २० टक्के क्षेत्रात आजपर्यंत पेरण्या झाल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६.९८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. सद्यस्थितीत १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही २०.४५ टक्केवारी आहे. यामध्ये तिवसा व अंजनगाव या तालुक्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. मात्र, तूर्तास सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. २४ तारखेनंतर पावसात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

९ व ११ जूनला सर्वाधिक पाऊस

जूनच्या २० दिवसांत पावसाचे १५ दिवस राहिले असले तरी १६५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. यापैकी ९ जूनला २१ व ११ जूनला ३० मिमी पाऊस झाला. याव्यतिरिक्त अन्य दिवस १ ते १० मिली दरम्यान विखुरता झालेला आहे. सार्वत्रिक पावसाची नोंद दोनच दिवस झालेली आहे. पेरणीयोग्य दमदार पाऊस अद्यापही नसल्याने, या काळात पेरणी करणे जिरायती क्षेत्रासाठी धाडसाचे ठरणार आहे.

बॉक्स

२४ जूननंतर वाढणार पाऊस

जिल्ह्यात २२ पर्यंत एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. दरम्यान या काळात कडक उन्ह राहून वारादेखील राहील. त्यामुळे बास्पीभवन होऊन जमिनीचा पापुद्रा हलका होण्याची शक्यता आहे. बियाणे महाग असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट परवडण्यासारखे नाही. दरम्यान सोयाबीनची १५ जुलैपर्यंत तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

तालुकानिहाय झालेली पेरणी

जिल्ह्यात सद्यस्थितीत धारणी तालुक्यात १, ५९१ हेक्टर, चिखलदरा १,०९४, अमरावती ५,३०५, भातकुली १,५३१, नांदगाव खंडेश्वर १३,५०९, चांदूर रेल्वे, ८,०९३, तिवसा १४,९५९, मोर्शी १२,५१०, वरुड १०,८९३, दर्यापूर ५७२, अंजनगाव सुर्जी १६,६८१, अचलपूर ४,६४०, चांदूर बाजार १२,८९६ व धामणगाव तालुक्यात ३५,८१० अशी एकूण १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

बॉक्स

संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पेरणी करावी, जिरायती क्षेत्रात रिस्क घेणे परवडणारे नाही. त्यामुळे काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी. सोयाबीन १५ जुलैपर्यंत व तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येते.

- विजय चवाळे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी