शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मैदान झोपडपट्टीत राडा, तणावाची स्थिती

By admin | Updated: January 5, 2015 22:54 IST

दसरा मैदान झोपडपट्टीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही गुडांनी लाठ्याकाठ्या व लोंखडी पाईपने हल्ला करुन एका कुटुबांतील दोन जणांना जखमी केले. या हल्यात ज्ञानेश्वर गणपत वानखडे

अमरावती : दसरा मैदान झोपडपट्टीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही गुडांनी लाठ्याकाठ्या व लोंखडी पाईपने हल्ला करुन एका कुटुबांतील दोन जणांना जखमी केले. या हल्यात ज्ञानेश्वर गणपत वानखडे व त्यांची पत्नी जखमी झाली. घटनेनंतर दोन गटात हाणामारी सुरु झाल्याने गोंधळ उडाला होता. राजापेठ पोलिसांनी दोन्ही गटांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान येथील ज्ञानेश्वर वानखडे यांच्या पत्नीला आरोपी पटेल बावरी, गज्जू बावरी व बनवारी नामक युवकांनी मद्यधुंद अवस्थेत शिविगाळ केली. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी विरोध केला असता आरोपींनी संगनमत करुन वानखेडे दाम्पत्यावर लाठ्याकाठ्या व लोखंडी पाईपने हल्ला चढविला. हा गोंधळ सुरु असतानाच वानखेडे यांचे काही सहकारी एकजुटीने समोर आले. यावेळी दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली होती. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांनी मिळताच पोलिसांचा ताफा दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीत दाखल झाला. पोलिसांनी तणावग्रस्त स्थितीवर नियंत्रण मिळविले तसेच दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुध्द तक्रारी नोंदविल्या. ज्ञानेश्वर वानखेडेंच्या तक्रारीहून पोलिसांनी आरोपी पटेल बावरी, गज्जू बावरी व बनवारी विरुध्द तर अंजू अजय बावरीच्या तक्रारीहून ओम वानखेडे, राजू वानखेडे, नीलेश गायकवाड, ज्ञानेश्वर वानखेडे विरुध्द कलम ३२४, ३४नुसार गुन्हा नोंदविला