शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

करजगावात पावसाने रबीचे नुकसान

By admin | Updated: March 15, 2015 00:36 IST

निसर्गापुढे मनुष्य हतबल आहे. याचा अनुभव यावर्षी प्रकर्षाने येत आहे. बळीराजाचे उभे पीक हातून गेले. या नापिकीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.

प्रमोद राऊत करजगावनिसर्गापुढे मनुष्य हतबल आहे. याचा अनुभव यावर्षी प्रकर्षाने येत आहे. बळीराजाचे उभे पीक हातून गेले. या नापिकीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. चांदूरबाजार तालुक्यात कापूस हे मुख्य पीक. परंतु गंभीर रोगाने त्याचा नायनाट केला. पर्यायाने कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. यामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला. कापसाच्या हंगामावर शेतमजुरी अवलंबून असते. प्रामुख्याने कापूस वेचण्याची कामे मजुरांकडून करवून घेतली जातात. पण कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने मजुरांना मजुरी मिळणे अशक्य झाले आहे. यावरून या परिसरातील नापिकीची दाहकता लक्षात येते. घरात धान्य नाही, शेतात काम नाही. यामुळे शेतमजुराची अवस्था बिकट झाली आहे. शेतीच्या हंगामात जमा केलेले धान्य मजुरी नसल्यामुळे खाण्यात आले. पण भविष्यात कसे जगणार या विचारचक्रात तो गुंतला आहे. रोजगाराच्या कामाला सुरूवात झाली असली तरी तो गावापासून दूर जाण्यास तयार नाही. गावात काम नाही, घरात धान्य नाही. यामुळे ग्रामीण भागात वस्तू गहाण ठेवण्याचे प्रकार सुरू केल्याने त्यांचे घरातील चुली किती दिवस पेटणार, हाच खरा प्रश्न आहे. यंदा खरीप हंगामातही पाहीजे त्या प्रमाणात उत्पन्न झाले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता रबी हंगामावरही निसर्ग कोपल्याने वाईट अवस्था आहे.बाजारपेठेत मंदीकापूस व संत्रा नसल्याने बाजारपेठेत मंदीचे सावट आले आहे. मालाला उठाव नसल्याने व्यापारी वर्गसुद्धा नापिकीच्या फटक्याने गारद झाला आहे. परिसरातील गरीब शेतमजुरांची मुले अक्षरश: घरदार सोडून कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. पण तेथेही त्यांना काम मिळत नसल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. जेथे व्यापाऱ्यांची दैनावस्था झाली तेथे त्यांना रोजगार कोण देणार, हा खरा प्रश्न आहे. शेतकरी यावर्षी नापिकीने पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. तो वर्षभर दुकानदाराकडून कपडे, किराणा, कृषीविषयक साहित्य उसनवारीने घेत असतो. त्याची परतफेड कशी करावी ही चिंता त्याला सदासर्वकाळ सतावत आहे. त्यामुळे अनेकांवर अल्पभावात जमिनी विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र विक्रीस काढलेल्या जमिनीला खरेदीदार मिळत नसल्याने चहूकडून बळीराजाची कोंडी होत आहे.जनावरांची विक्रीयंदा शेती पिकली नसल्यामुळे वैरणाची समस्या निर्माण झाली. जंगलातही चाऱ्याची पाहिजे त्या प्रमाणात उगवन नसल्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे विक्रीला काढली आहे. नापिकीच्या फटक्याने ते आता कोठून जनावरांच्या वैरणाची सोय लावणार, कुटार, कडबा यांचे भाव आकाशाला भिडल्याने जनावरांचे पालन करणे कठीण झाले आहे.