शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा धरणाची पातळी घसरली

By admin | Updated: July 12, 2014 00:35 IST

पावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही.

सुरेश सवळे चांदूरबाजारपावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही. म्हणून प्रतीक्षा करून थकलेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजाने पुनर्वसूच्या ‘गाढव’वर विश्वास ठेवून घाईगर्दीने खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणी सुरू केली आहे. मागील वर्षी या काळात पूर्णा धरणात अतिरिक्त पावसाचे पाणी पाठवल्यामुळे दोनदा धरणाची दारे उघडावी लागली होती. मात्र यंदा अतिरिक्त साठा तर सोडाच; आहे त्या पातळीतही एक मिटरने झालेली घट भविष्यातील पाणी टंचाईची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे. मृगात पेरणी करण्यासाठी किमान १०० मि.मी. पावसाची गरज असताना ती अपेक्षा मृगाने पूर्ण केली नाही. परिणामी मृगात पेरल्या जाणारे मूग, उडीद या सारख्या पिकांना पेरणीतून हद्दपार व्हावे लागले. सोयाबीन पिकालाही मृग किंवा आर्द्राच्या पावसाची गरज असते. या पिकाची पेरणी जास्तीत जास्त १५ जुलैपर्यंत व्हावी, तेव्हाच अपेक्षेप्रमाणे उत्पादन होण्याची शक्यता असते. त्याच आशेवर आता शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध सोयाबीन बियाण्यांच्या पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख ७९ हजार ८८० पीक पेरणीचे लक्ष प्रशासनाचे होते. मात्र पेरणीला आवश्यक पाऊस न झाल्यामुळे १ जूनपासून जिल्ह्यात केवळ ८०.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, ज्वारीसह अन्य तेलबिया ही खरिपातील नगदी पिके आहेत. यंदा जिल्ह्यात पडलेला पाऊस सार्वत्रिक नसल्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी दैव व नशिबावर विश्वास टाकून १० हजार हेक्टरवर सोयाबीन, २ हजार ३१२ हेक्टर कापूस, २ हजार ९४० हेक्टर तूर व केवळ २४० हेक्टर जमिनीत मुगाची पेरणी केली. जिल्ह्यात एकूण ३३ हजार ८७७ हेक्टरवर पेरणी करण्याचे धाडस आजपर्यंत शेतकऱ्यांनी दाखविले आहे. मात्र पुनर्वसूतील पावसाने नियमित हजेरी लावली नाही तर शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण नगण्य असल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत आहे. दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडे अद्याप तरी कोणत्याच उपाययोजना नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. काही शेतकऱ्यांना पेरणी न करताच कर्ज भरण्याचा तगादा लावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा स्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता प्रशासनाकडे यावर योजना अद्याप तरी नसल्याचे वास्तव आहे.