शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा येथील युवतीकडून करून घेतला जात होता अमरावतीत वेश्याव्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST

अमरावती : अकोली मार्गावरील खंडेलवाल नगरातील साहू ले-आऊटमधील देहविक्रयाचा अड्डा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून उद्ध्वस्त केला. ...

अमरावती : अकोली मार्गावरील खंडेलवाल नगरातील साहू ले-आऊटमधील देहविक्रयाचा अड्डा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून उद्ध्वस्त केला. या ठिकाणी वर्धा येथील युवतीला अमरावतीत आणून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. तिच्यासोबत अमरावती येथील एक युवतीसुद्धा वेश्याव्यवसाय करीत होती, असे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

वर्धा येथील २२, तर अमरावती येथील २१ वर्षीय युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना नागपूर येथील पुनर्वसन व सुधार केंद्रात पाठविले. त्यांना तेथे २१ दिवसांपर्यंत ठेवण्यात येणार आहे. वर्धा येथील एका महिला हा कुंटणखाना चालवित होती. तिला खेर्डा (ता. कारंजा लाड) येथील आरोपी युवक साहाय्य करीत होता. सदर युवक हा ग्राहक शोधण्यासाठी मदत करायचा. कुंटणखाना चालविण्याकरिता साहू ले-आऊटमध्ये एक महिन्यापूर्वी वर्धा येथील आरोेपी महिलेने भाड्याने रूम घेतली. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या वर्धा व अमरावती येथील तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. दिवसभर किंवा रात्री या ठिकाणी कार व दुचाकीने वेगवेगळे ग्राहक यायला लागले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ग्राहक येताना आजूबाजूच्या महिलांकडेसुद्धा वाईट नजरेने पाहिले जात होते. यामुळे परिसरातील महिला त्रस्त होत्या. या विषयी तक्रार त्यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी शहर गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोन बनावट ग्राहक तयार केले. त्यांना पाठविल्यानंतर पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर वर्धा येथील कुंटणखाना चालविणारी मुख्य महिला व तिला मदत करणाऱ्या एका युवकाला अटक केली. येथे नको त्या अवस्थेत सापडलेल्या दोन तरुणींनाही ताब्यात घेण्यात आले.