शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांसाठी मालमत्ता कर अभय योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

अमरावती : मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने २५ जानेवारी ते १५ मार्च २०२१ या कालावधीकरिता 'मालमत्ता कर अभय ...

अमरावती : मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने २५ जानेवारी ते १५ मार्च २०२१ या कालावधीकरिता 'मालमत्ता कर अभय योजना' लागू करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेतला. याचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे महापालिकेचा मुख्य महसूल स्रोत असलेल्या मालमत्ता करांची वसुलीही कमी झालेली आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा देणारी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. थकबाकी असलेल्या नागरिकांनी मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक २० टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना ८० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक रकमेवर सूट मिळणार आहे.

या अभय योजनेस कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसून मालमत्ता करांची रक्कम व ८० टक्के सवलत वगळून उर्वरित २० टक्के दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरावयाची आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रकमेस अभय योजना लागू राहणार नाही. असे महापौरांनी स्पष्ट केले. अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रकमांना अभय योजना लागू राहणार नाही, याची नागरिकांनी विशेष नोंद घ्यावी. अभय योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी अभय योजनेंतर्गत दावा करता येणार नाही.

बॉक्स

पाचही झोन कार्यालयांत सुविधा

अभय योजनेंतर्गत सर्व पाचही झोन कार्यालयांच्या ठिकाणी तसेच आपल्या वसुली लिपिकांमार्फत रोख / धनादेश / धनाकर्ष याव्दारे रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी दिलेले धनादेश अभय योजनेच्या कालावधीत न वटल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय महापालिकेच्या www.amtcorp.org या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरणा नागरिकांना करता येईल.