शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अड्डा-२७ विरुद्ध अखेर पोलीस तक्रार

By admin | Updated: May 21, 2017 00:01 IST

"शॉप अ‍ॅक्ट"च्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या "अड्डा २७" या हुक्का पार्लरविरुद्ध अखेर कोतवाली पोलिसात शनिवारी तक्रार नोंदविण्यात आली.

देर आए- दुरुस्त आए : सहायक कामगार आयुक्तांच्या हुकुमाची निरीक्षकांनी केली तामिललोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : "शॉप अ‍ॅक्ट"च्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या "अड्डा २७" या हुक्का पार्लरविरुद्ध अखेर कोतवाली पोलिसात शनिवारी तक्रार नोंदविण्यात आली. सहायक कामगार आयुक्त आर.बी.आडे यांच्या आदेशानुसार दुकाने निरीक्षक अर्चना कांबळे यांनी ही तक्रार नोंदविली.दोन दिवसांपूर्वीच आर.बी.आडे यांनी अधिनिस्थ यंत्रणेला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हुक्का पार्लरविरुद्ध फौजदारी तक्रार करण्याचे आदेश दिले होते. ‘लोकमत’ने हुक्का पार्लरचे वास्तव लोकदरबारात उघड केल्यावर यंत्रणा हलली, हे उल्लेखनीय.रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावरील अड्डा-२७ या हुक्का पार्लरची पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर संबंधित चालकाने सहायक कामगार आयुक्त कार्यालायाची अधिकृत नोंदणी असल्याचा दावा केला होता. सरकारी कामगार अधिकाऱ्यांनीही दुकाने निरीक्षकांची ती चूक मान्य करून चौकशी सुरूकेली होती. अंबानगरीत नव्याने रूजू पाहणाऱ्या हुक्का पार्लर संस्कृतीवर बजरंग दलाने आक्रमक प्रहार केला. त्याअनुषंगाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव वाढला होता. ंअखेर शहरातील पाच हुक्का पार्लरचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. सोमवारी देणार दस्तावेजअमरावती : त्यामध्ये अड्डा-२७ या हुक्का पार्लरचाही समावेश होता. त्या पार्श्वभूमिवर सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून अड्डा २७ या हुक्का पार्लरसाठी नाहरकत प्रमाणपत्र घेणाऱ्या मनोज बडनखेविरोधात तक्रार नोंदविली आहे. दुकाने निरीक्षकांकडून आवश्यक ती कागदपत्रे सोमवारी पोलिसांच्या सुपूर्द केली जाईल. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली असून चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. अड्डा-२७ या हुक्का पार्लरने नोंदणी प्रमाणपत्राचे उल्लघंन केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षकांना दस्तऐवज मागविण्यात आले आहे. चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात येईल. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे. अड्डा-२७ या हुक्का पार्लर व्यवसायाचे प्रमाणपत्र मनोज बडनखे यांच्या नावे असून त्यांनी प्रमाणपत्राचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने सहायक कामगार आयुक्त यांच्या आदेशाने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. - अर्चना कांबळे, दुकाने निरीक्षक,