शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

पोहरा-वडाळी, चिरोडी वर्तुळात दावानल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 05:00 IST

चार दिवसांपासून लागोपाठ वनकर्मचाऱ्यांना आगीचा सामना करावा लागला. रविवारपासून बुधवारपर्यंत आगीच्या घटना सतत घडल्याने सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर हे घटनास्थळावर पोहोचून आग नियंत्रणात येईपर्यंत घटनास्थळावर तळ ठोकून होते. जेवड, अंजनगाव बारी, उत्तर वडाळी, परसोडा, उत्तर चोरआंबा या पाच बीटमध्ये आगी लागल्याने काही हेक्टर जंगल जळाले.

ठळक मुद्देवनकर्मचारी अस्वस्थ, रविवार ते बुधवारपर्यंत पाठोपाठ आगी, घातपाताचा संशय बळावला

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : पोहरा आणि वडाळी वनवर्तुळात चार दिवस लागोपाठ आगी लागल्याने वनकर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. जंगलातआग लागल्याचे लक्षात आल्यानंतर ती भडकण्यापूर्वीच तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी निरीक्षण झोपड्या उभारल्या आहेत. वडाळी रेंजमध्ये आगीचा सामना करण्यासाठी तीस ब्लोअर मशीनची सज्जता करण्यात आली आहे. तरीदेखील आगी आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. या रोजच्या आगीमुळे वनपाल, वनरक्षक, वनमजूर, संरक्षण मजूर यांची पुरती दमछाक झाली आहे. हिवाळ्यापासून तर आतापर्यंत पोहरा आणि वडाळी या दोन वर्तुळांत लागलेल्या आगीने अर्ध्यापर्यंत जंगल खाक झाले आहे.चार दिवसांपासून लागोपाठ वनकर्मचाऱ्यांना आगीचा सामना करावा लागला. रविवारपासून बुधवारपर्यंत आगीच्या घटना सतत घडल्याने सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर हे घटनास्थळावर पोहोचून आग नियंत्रणात येईपर्यंत घटनास्थळावर तळ ठोकून होते. जेवड, अंजनगाव बारी, उत्तर वडाळी, परसोडा, उत्तर चोरआंबा या पाच बीटमध्ये आगी लागल्याने काही हेक्टर जंगल जळाले. त्यामध्ये वृक्ष, झुडपे, पालापाचोळा, गवत जळून खाक झाल्याने संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील या घनदाट जंगलामध्ये दावानल पसरतो. ती काबूत आणण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो. जंगल नष्ट होते ते वेगळेच.

चिरोडी वनवर्तुळात दहा हेक्टर जंगल जळून खाकचिरोडी वर्तुळात येणाऱ्या लालखेड बीट वनखंड क्रमांक ३१५ मध्ये रविवार दुपारी १ वाजता लागलेली आग ४ वाजता आटोक्यात आली. या आगीत सुमारे १० हेक्टर जंगल जळून खाक झाले. ती आग विझवताना आधुनिक साहित्य, साधन सामग्रीचा वापर करण्यात आला. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळ अधिकारी एस.एस. अली, वनरक्षक दीपा बेलाह, गोविंद पवार, राजन हिवराळे, आशिष महले, राहुल कैकाडे, अतुल घस्कट, वनमजूर शेख रफीक, विनायक लोणारे आदींनी आग विझविण्यासाठी कामगिरी बजावली.

 

टॅग्स :forestजंगलfireआग