शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक विम्यासाठी साडेसहा कोटींचा भरणा

By admin | Updated: December 8, 2015 00:14 IST

नैसर्गिक आपत्ती तसेच किडी व रोग यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांनी ...

राष्ट्रीय कृषी पीक विमा : योजनेत १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांचा सहभागअमरावती : नैसर्गिक आपत्ती तसेच किडी व रोग यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. यासाठी ६ कोटी ६६ लाख ३१ हजार रूपयांचा भरणा वित्तीय संस्थांकडे केला आहे. खरीप हंगाम २०१५ साठी राष्ट्रीय कृषि पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप ज्वारी, भात, उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन व कपाशी या पिकासाठी १ लाख ३४ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केलेले आहे. खरीप ज्वारीसाठी २ हजार ५५९ शेतकऱ्यांनी १ हजार ८२५ क्षेत्रासाठी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. भातासाठी १ हजार १९२ शेतकऱ्यांनी ५६१ हेक्टरसाठी १ लाख ४३ हजार रुपयांचा भरणा केला आहे. उडीदासाठी १ हजार ४४६ शेतकऱ्यांनी १ हजार १२६ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले. यासाठी १ लाख ४३ हजार रूपये विमा हप्ता भरला आहे. मुगासाठी १५ हजार ४७५ शेतकऱ्यांनी १८ हजार ८४० हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला. यासाठी ४४ लाख ८६ हजार रूपयांचा विमा हप्ता भरलेला आहे. तूर पिकासाठी २८ हजार ३४२ शेतकऱ्यांनी १० हजार ५३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले यासाठी ३५ लाख ४५ हजारांचा भरणा केलेला आहे. सोयाबीनसाठी ७६ हजार ६७१ शेतकऱ्यांनी ८६ हजार ५८५ हेक्टर क्षेत्र विम्यासाठी संरक्षित केले. यासाठी ३ कोटी ५० लाख ३२ हजार रुपयांचा भरणा केलेला आहे. कपाशी पिकासाठी १७ हजार ८३७ शेतकऱ्यांनी १५ हजार ३४० हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी २७ लाख ७८ हजार रुपयांचा भरणा वित्तीय संस्थेकडे केला आहे. यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरिपाचा हंगाम उद्धवस्त झाला. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असल्यामुळे विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)