शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पॅथालॉजी लॅबचालकांकडून रुग्णांची वारेमाप लूट

By admin | Updated: March 5, 2016 00:21 IST

वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांनी जिल्ह्यात थैमान घातले आहे. निरनिराळया वैद्यकीय चाचण्यांच्या नावाखाली बहुतांश पॅथालॉजी लॅबचालकांनी रुग्णांची वारेमाप लूट चालविली आहे.

का नकोत दरफलक ? : नियंत्रण कुणाचे ? लॅबनिहाय बदलतात दरअमरावती : वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांनी जिल्ह्यात थैमान घातले आहे. निरनिराळया वैद्यकीय चाचण्यांच्या नावाखाली बहुतांश पॅथालॉजी लॅबचालकांनी रुग्णांची वारेमाप लूट चालविली आहे. विविध रुग्णालये, खासगी प्रॅक्टीशनर्सच्या गुंतलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे ‘डीएमएलटी’ पदविका घेऊन अनेकांनी ‘लॅब’ थाटल्या आहेत.रक्त, लघवी, थायरॉईड या सारख्या तपासण्यांच्या दरात शहरात दुप्पट वाढ झाली आहे. ठरावीक प्रयोगशाळांकडूनच तपासणीचा आग्रह धरला जातो. लॅबनिहाय तपासणीदरामध्ये मोठी तफावत आढळते. शहरात रक्तपूरक घटक तपासणाऱ्या लेबॉरेटरीजची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे, याची माहिती लोकांना नाही. या सेवेत व्यावसायिक वृत्ती वाढत आहे. अशा लॅबकडून होणाऱ्या लुटीला आळा घालावा, अशी मागणी होऊ लागली आहे. पॅथालॉजी लॅबमध्ये हवेत दरफलक शहर तथा जिल्ह्यातील बहुतांश लॅबमध्ये तपासणी शुल्काचे दरफलक दिसत नाहीत, एकाच तपासणीचे विविध लॅबमधील दर वेगवेगळे आहेत. ‘एमडी’ पदविधारक पॅथालॉजीस्ट आणि ‘डीएमएलटी’धारक अशा दोन प्रकारच्या लॅब आहेत. या लॅबमध्ये दरफलक आवश्यक आहेत. महागाई वाढल्याचे कारण सांगून अनेक पॅथालॉजी लॅबचालकांनी तपासणी शुल्कात भरघोस वाढ केली आहे. पॅथॉलॉजी लॅबमध्ये समसमान दर असावेत, अशी रुग्ण व नागरिकांची माफक अपेक्षा असते. मात्र, एकाच चाचणीचे दर लॅबनुसार बदलतात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे रूग्णांची ससेहोेलपट होते. (प्रतिनिधी)पॅथॉलॉजी लॅबचे अ‍ॅक्रिडेशन झाले नसल्याने त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे कारवाई कुणी करावी, हे निश्चित नाही. आणि पॅथॉलॉजी लॅब चालविणाऱ्यांच्या संघटनाही आहेत. लॅबची संख्या सांगता येणार नाही. - अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सकगुंतागुंतीच्या आजाराचे निदान वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोगाचे योग्य निदान करणे सुलभ झाले आहे. यात रक्त, लघवी व पूरक घटकांच्या तपासण्यांद्वारे गुंतागुंतीच्या आजाराचे निदान करता येते. शहरात रक्त, लघवी, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या तपासण्या करणाऱ्या ‘डायग्नोस्टिक सेंटर’ची संख्या वाढत आहे. बहुतेक ठिकाणी तपासणीचे दर मात्र भिन्न आहेत. डॉक्टरनिहाय बदलतात लॅब !एकच रुग्ण दोन डॉक्टरकडे गेल्यास दोन दिवस आधी केलेल्या तपासणीचा अहवाल बहुतांश डॉक्टर्स स्वीकारत नाहीत. डॉक्टर्स बदलले की पॅथालॉजी लॅबही बदलते आणि सगळ्या तपासण्या नव्याने कराव्या लागतात. एखाद्या रुग्णाच्या तपासणीचा रिपोर्ट एका लॅबमध्ये निगेटिव्ह येतो, तर त्याच तपासणीचा दुसऱ्या लॅबमधील रिपोर्ट मात्र पॉझिटीव्ह येतो, असे प्रकार वेळोवेळी पाहायला मिळतात. नाकारले जातात अहवाल कुठलाही रुग्ण पैसे वाचविण्यासाठी तुलनेत कमी दर असलेल्या शासकीय, सहकारी किंवा एखाद्या ट्रस्टच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या पॅथालॉजी लॅबमधून तपासणी करुन घेतो. मात्र, बहुतांश डॉक्टरांकडून तो नाकारला जातो.