शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भीतीने एसटीतून प्रवास करायला नागरिक नकार देत आहेत.

ठळक मुद्देदिवसाला ३५ हजारांचे उत्पन्न : दररोज धावतात २५ बस

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गरिबांचा रथ मानल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे कोरोनामुळे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. ग्रामीण भागात तीन आठवड्यांपासून बससेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशांची त्याकडे पाठ आहे. दिवसाला फक्त ३० ते ३५ हजारांचे उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक माहिती महामंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.
जिल्ह्यातून पूर्वी दिवसाला ४०५ एसटी बस धावायच्या; आता फक्त २५ बसेस ग्रामीण भागात धावत आहेत. एसटीला प्रतिदिन ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न मिळायचे. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भीतीने एसटीतून प्रवास करायला नागरिक नकार देत आहेत. त्यातच अमरावती व बडनेरा क्षेत्रात एसटीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्याकारणानेही एसटीच्या उत्पन्नाला फटका बसत आहेत.
अमरावती शहराकरिता बससेवा सुरू झाल्यास एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. सद्यस्थितीत ग्रामीण भागात २५ बस अडीच ते तीन हजार किमीचा प्रवास करीत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनच्या पूर्वी प्रतिदिन एक ते दीड लाख किमी बस अंतर कापायच्या त्यातून ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न मिळायचे. आत ते उत्पन्न ठप्प झाले आहे. दर्यापूर, परतवाडा, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, मोर्शी, वरूड या आगारांतून सद्यस्थितीत बससेवा सुरू असून अमरावती वगळता जिल्ह्याच्या सीमारेषांपर्यंत त्यांच्याकडून प्रवाशांची ने-आण होत आहे.

तीन आठवड्यांपासून प्रवाशांची संख्या वाढली नाही. बस कमी करण्यात आल्या. आता २५ बसेस धावत आहेत. अडीच हजार किमीचा प्रवास होत असून प्रतिदिन ३५ हजाराचे उत्पन्न येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक अमरावती

टॅग्स :Socialसामाजिक