शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांची निर्दयता : वडाळीतील विहिरीत आढळला मृतदेह

By admin | Updated: October 15, 2016 00:10 IST

अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला विहिरीत फेकून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली.

सहा महिन्यांची चिमुकली ‘नकोशी’अमरावती : अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला विहिरीत फेकून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हा क्रूर प्रकार वडाळी राम मंदिरानजीक शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आणि पंचक्रोशीत खळबळ उडाली. फे्रजरपुरा पोलिसांनी ‘नकोशी’चे अशा क्रौर्याने प्राण घेणाऱ्या माता-पित्यांची शोधमोहीम सुरु केली आहे. एकीकडे शासन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देते, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही मुलगी झाली की नाका-तोंडावर आठ्या पाडणारे पालक दिसून येतात. त्यातील काही नाईलाजास्तव त्या मुलीचा सांभाळ करतात तर काही पालक निर्दयतेची परिसीमा गाठून ‘नकोशी’चे प्राण घेण्यापर्यंत मजल मारतात. शुक्रवारी सकाळी वडाळी परिसरात उघडकीस आलेल्या या घटनेवरून तर ही बाब अधिक स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. राम मंदिरानजीकच्या विहिरीत लहान बाळाचा मृतदेह तरगंत असल्याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळाली होती. नागरिक अनभिज्ञ कसे?वडाळीतील राममंदिर परिसरात दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरुच असते. त्यामुळे लोकवस्तीतील विहिरीत फेकलेल्या बाळाबद्दल कोणालाच कसे कळले नाही, याबद्दल पोलीस साशंक आहेत. सहा ते सात महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. तपासाअंती गूढ बाहेर येईल. पी.एस.वंजारी, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे.