शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीला कुलूप लावून पांडे पसार

By admin | Updated: April 4, 2017 00:20 IST

सिंधी कॅम्प परिसरातील राम-लक्ष्मण संकुलातील क्रिऐटिव्ह अ‍ॅकेडमीला कुलूप लावून मनोज पांडे पसार झाला आहे.

विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण : पोलिसांचे तीन पथकाद्वारे शोधकार्यअमरावती : सिंधी कॅम्प परिसरातील राम-लक्ष्मण संकुलातील क्रिऐटिव्ह अ‍ॅकेडमीला कुलूप लावून मनोज पांडे पसार झाला आहे. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पांडेवर आहे. आरोपी मनोज पांडेला अटक करण्यासाठी गाडगेनगर पोलिसांच्या तीन पथकांनी शोधकार्य सुरु केले आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना लेखाकर्म विषयाचे शिक्षण देणाऱ्या मनोज पांडे याने एका २० वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. अ‍ॅकेडमीच्या आड विद्यार्थिनीसोबत असले अश्लिल प्रकार घडत असल्याने ही बाब शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संबंधांना काळीमा फासणारीच आहे. राम-लक्ष्मण संकुलाच्या पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमी आहे. यासंकुलात केवळ मोजकीच दुकाने असून तिसरा मजला क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीटच्याच ताब्यात आहे. संकुलाच्या एका बाजूने पायऱ्या असून तिसऱ्या मजल्यापर्यंत शुकशुकाट असतो. सकाळच्या सुमारास या अ‍ॅकेडमीत विद्यार्थी शिकवणीसाठी यायचे. त्यानंतर या संकुलात भयाण शांतता असते. अशा निर्मनुष्य संकुलात मनोज पांडे शिकवणीवर्ग घेत होता. या अ‍ॅकेडमीच्या पाच ते सहा वर्गखोल्या असून त्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. पांडेच्या पाच सहकाऱ्यांची चौकशीअमरावती : मात्र, चार दिवसांपासून दोन्ही प्रवेशद्वारांचे शटर्स बंद असल्याचे सांगितले जात आहे. लाजीरवाणा प्रकार उघड होण्याची चिन्हे दिसताच मनोज पांडे याने अ‍ॅकेडमीला कुलूप लावून पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सोमवारी गाडगेनगर पोलिसांनी क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीची पाहणी केली. मात्र, त्यांना शटर्सला कुलूप लागल्याचे आढळून आले. त्यांनी संकुलातील चौकीदाराची चौकशी केली असता मनोज पांडे हा शिकवणीवर्ग संपल्यानंतर दुपारी तरूणीसह दुचाकीवरून यायचा आणि अ‍ॅकेडमीतील कक्षामध्ये तास दोन तास थांबायचा, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी मनोज पांंडेच्या महेंद्र कॉलनीतील घरी जाऊन चौकशी केली असता त्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वीच आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचे कळले. मात्र, लग्नानंतर ते अद्याप घरी न आल्याचेही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. यासंदर्भात कसून चौकशी सुरू आहे.पोलीस आयुक्तांच्या सक्त सूचनाविद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणप्रकरणाची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून मनोज पांडेला तत्काळ अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना दिल्या आहेत. मनोज पांडेची मित्र मंडळी व कुटुंबातील पुरुषांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच पांडेच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचे शोधकार्य सुरु आहे. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले आहे. मनोज पांडेला अटक करून कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्यायाविरूद्ध मुलींनी पुढे यावेक्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीचे संचालक मनोज पांडे याचे हे कृत्य शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे. लैंगिक शोषणाविषयी सध्या एका मुलीने तक्रार केली आहे. मात्र, अन्य मुलींबाबतही असे प्रकार घडले असतील तर त्या विद्यार्थिनींनी धाडसाने पुढे येऊन नि:संकोचपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले आहे.