शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटरवर पाणवठे

By admin | Updated: March 2, 2017 00:03 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांना जंगलाबाहेर पडावे लागते. मात्र, यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्याची निर्मिती, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

वन्यजीवांची सुरक्षितता : जंगलात पाण्यासाठी भटकंती नाहीअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांना जंगलाबाहेर पडावे लागते. मात्र, यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्याची निर्मिती, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी व्याघ्र प्रकल्पात सुरु झाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभागात नैसर्गिक व कृत्रिम असे ९६० पाणवठे आहेत. मात्र, वन्यजीवांची वाढत चाललेली संख्या बघता हे पाणवठे कमी पडू लागले आहेत. मेळघाटात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अत्यल्प आहेत. त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांच्या शिकारी अथवा मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पातील उपवनसंरक्षकांना दर दोन किलोमीटरच्या आत एक पाणवठा निर्माण करण्याच्या सूचना क्षेत्र संचालकांनी दिल्या आहेत. काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले जाणार आहेत. १५ मार्चपर्यत वन्यजीवांसाठी पाणवठे सज्ज राहतील, असा दावा व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.१५ दिवसांत पाणवठे तयारअमरावती : जेमतेम मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार, असे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार एप्रिल, मे व जून महिन्यात जंगलात पाणीसमस्या उद्भवणार नाही, ही काळजी घेतली जात आहे. तसेच जंगलात आग लागू नये, यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ राबविला जात आहे. यापूर्वी मेळघाटात लागलेल्या आगीच्या घटनांचा आढावा घेत व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी आग रोखण्यासाठी संयंत्रे, अद्ययावत साहित्य, पुरेसे मनुष्यबळ सज्ज ठेवले आहे. व्याघ्र प्रकल्पातील जंगलात सर्वाधिक नैसर्गिक पाणवठे तयार करण्यावर भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)मेळघाटात हे आहेत वन्यपशूमेळघाट व्याघ्र प्रकल्प वनसंपदेने नटलेला आहे. वन्यपशू, सरपटणारे प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यात वाघ, बिबट, हरिण, काळवीट, तडस, खवल्या मांजर, सायाळ, रानकुत्रे, सांबर, रानडुक्कर, शेवशिंगा, लांडगा, नीलगाय, अस्वल, भेडकी, गव्हा, लाल तोंडाचे माकड, चितळ, रानमांजर आदींचा समावेश आहे. इतरही अनेक पशू या जंगलात मुक्तसंचार करतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत यावेळी उन्हाळ्यात वन्यपशू, प्राण्यांना पाणीटंचाई भासणार नाही. मागील आठवड्यातील बैठकीत हा मुद्दा आवर्जुन हाताळण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सूचना दिल्या असून १५ दिवसांत पाणवठे तयार होतील.- एम.एस.रेड्डीक्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प