या चारही नाक्यावर शिक्षकांना कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले आहे. शिक्षक, पोलीस पाटील व कर्मचारी या नाक्यांवर सेवा देत आहेत. बाजार चौक ते शिंदी रस्ता, इसापूर रस्ता, रासेगाव रस्ता व कुष्टा रस्त्यावर हे कंटेनमेंट झोन आहे. या चार रस्त्यांवरच ते चार नाके ...
प्रतिबंधित काळात रुग्णांचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएससी) व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) येथे दाखल करावयाचे आहेत. यामध्ये अतिसौम्य किंवा लक्षणे नसणाऱ्या ...
कोरोना विषाणूने सर्वांना हादरून टाकले आहे. यामध्ये मात्र कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेतकºयांच्या घरी अजूनही हजारो क्विंटल कापूस पडून आहे. चांदूर बाजार तालुक्यात पेरणीयोग्य एकूण क्षेत्रफळ ५८,६९६ हेक्टर क्षेत्र आहे. सन २०१९-२० ...
यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढे आणखी भाव वाढतील या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मात्र, मध्येच देशात कोरोनाचा शिरकाव झाल ...
जरूडचा जावई असलेली नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील एक व्यक्ती मुंबईवरून पत्नी व मुलासह थेट सासरी जरुडला आली. हे जावई ५ जून रोजी नागपूर येथे कोरोना संक्रमित आढळले. त्याअनुषंगाने एका डॉक्टरसह पाच कुटुंबांतील १९ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना ब ...
पर्यावरण विभागाची मान्यता घेण्याची बाब निविदेत अंतर्भूत आहे. ती जबाबदारी कंत्राटदाराची होती. मात्र, या बाबीकडे कंत्राटदाराने सतत दुर्लक्ष केल्याने अखेर सिंचन विभागाने पुढाकार घेऊन पर्यावरण विभागाची मान्यता मिळविली. कंत्राटदाराने डिसेंबर २०१९ मध्ये प् ...
मुंबईहून अमरावती जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या पाच व्यक्ती आतापर्यंत संक्रमित झाल्याचा अहवाल आला आहे. यामध्ये २५ जूनमध्ये मुंबईहून चांदूर बाजार तालुक्यात आलेली २३ वर्षीय महिला व त्यांच्या तीन वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अचलपूर तालुक्यातील काकडा ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता, आवश्यक संसाधनांचा वापर करून शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थिहिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...
सहा दिवस मुक्काम ठोकून सदर जावई ३१ मे रोजी त्यांच्या मूळगावी वानाडोंगरी येथे परत गेले. परंतु, तेथे अचानक प्रकृती खालावली. कोरोनाचे लक्षणे असल्याचा वैद्यकीय अंदाज आल्याने त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. ५ जून रोजी सकाळी त्यांचा थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह ...