आठवड्याला आता ६० तासांचा 'कर्फ्यू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:01:07+5:30

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. याला अटकाव करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, घरनिहाय सर्वेक्षण करणे, लक्षणे असलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे, सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, प्रतिष्ठान, आस्थापनांवर दंडात्मक कारवाई सुरूच आहे. यासोबतच कोरोनाचे संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी आता ६० तासांच्या जनता कर्फ्यूचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

60-hour curfew per week | आठवड्याला आता ६० तासांचा 'कर्फ्यू'

आठवड्याला आता ६० तासांचा 'कर्फ्यू'

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत बाजारपेठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी संचारबंदीच्या कालावधीत दर आठवड्याला शुक्रवारी सायंकाळ ७ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठा बंद राहतील. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. शहरासह जिल्ह्यासाठी हा आदेश लागू आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. याला अटकाव करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, घरनिहाय सर्वेक्षण करणे, लक्षणे असलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे, सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, प्रतिष्ठान, आस्थापनांवर दंडात्मक कारवाई सुरूच आहे. यासोबतच कोरोनाचे संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी आता ६० तासांच्या जनता कर्फ्यूचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
संचारबंदीच्या कालावधीत शनिवार व रविवार या दोन दिवसांसाठी लागू आदेशानुसार महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्त, तालुकास्तर व इतर शहरांत मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी आवश्यक अंमलबजावणी करावी. महानगराचे पोलीस आयुक्त तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कडक नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे या कालावधीत बंद राहतील. पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी केल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांकडून देण्यात आले आहेत.

लग्न समारंभास नकार
संचारबंदीच्या काळात विवाह समारंभासाठी ज्यांनी प्राधिकृत यंत्रणांची परवानगी मिळवली आहे, ते समारंभ होऊ शकतील. मात्र, यापुढील कालावधीत शनिवार, रविवार या दिवशी लग्न समारंभाला परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

किराणा, धान्य , भाजीपाला बंद
सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स जनता कर्फ्यूत बंद राहतील. जीवनावश्यक वस्तंूमध्ये समावेश असलेली किराणा, धान्य दुकाने बंद राहतील. अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीचे अधिसूचित भाजीपाला व फळयार्ड हेसुद्धा या कालावधीत बंद राहतील.

वृत्तपत्रे राहणार सुरू
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, डीटीएच, केबल सेवा, वृत्तपत्रे सेवा (विक्री व वितरण) सुरू राहतील. त्याच्याशी संबंधित पत्रकारांना त्यांच्या कामाकरिता संचार करण्याची परवानगी राहील. पेट्रोल पंप सुरू राहतील. शासकीय हमीभावाप्रमाणे कृषिउत्पन्न बाजार समित्यांत होणारी खरेदी सुरू राहील.

या सेवा राहतील सुरू
अत्यावश्यक सेवा या दिवशी सुरू ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व दूध विक्री केंद्रे, डेअरी सकाळी ६ ते १० या वेळेत सुरू राहतील. सर्व आरोग्य सेवा, औषधी दुकाने पूर्णवेळ उघडी राहतील. एमआयडीसीतील उद्योग सुरू राहतील. वीज सेवा, गॅस सेवा, यंत्रणांनी मान्सूनपूर्व करावयाची कामे (रोड दुरुस्ती, नालेसफाई आदी) सुरू राहतील.

चारचाकी, दुचाकींवर होणार कारवाई
सर्व राष्ट्रीयीकृत सरकारी बँका, खासगी बँका, सहकारी संस्था, पतपेढ्या, आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्था बंद राहतील. अनावश्यक कारणासाठी चारचाकी किंवा दुचाकीद्वारे प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

Web Title: 60-hour curfew per week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.