दोन हजार प्राध्यापकांचे वेतन ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:08+5:30

तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची महाविद्यालयात नियुक्ती करताना नेट, सेट, पीएचडी आदी शैक्षणिक अर्हता तपासून संस्थांनी बिंदू नामावलीचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र, विद्यापीठांतर्गत काही नामांकित शैक्षणिक संस्थाचालकांनी मर्जीतील तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करून त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविले आहे. राज्य शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या निर्णयानुसार सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीमध्ये बिंदू नामावली लागू करण्यात आली आहे.

Two thousand professors' salaries' unlocked ' | दोन हजार प्राध्यापकांचे वेतन ‘अनलॉक’

दोन हजार प्राध्यापकांचे वेतन ‘अनलॉक’

Next
ठळक मुद्देसंस्थांनी बिंदू नामावली गुंडाळली : विद्यापीठाने रोखली मान्यता, सीएचबीची परवड

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करायची असल्यास राज्य शासनाने गाईड लाईन दिल्या आहेत. मात्र, काही शैक्षणिक संस्थांनी नियम गुंडाळून सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती केली. बिंदू नामावलीचे पालन झाले नसल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तब्बल दोन हजार सीएचबी प्राध्यापकांची मान्यता रोखली आहे. परिणामी या प्राध्यापकांचे उच्च शिक्षण विभाग वर्षभरापासून वेतन काढू शकले नाही, अशी माहिती आहे.
तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची महाविद्यालयात नियुक्ती करताना नेट, सेट, पीएचडी आदी शैक्षणिक अर्हता तपासून संस्थांनी बिंदू नामावलीचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र, विद्यापीठांतर्गत काही नामांकित शैक्षणिक संस्थाचालकांनी मर्जीतील तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करून त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविले आहे. राज्य शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या निर्णयानुसार सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीमध्ये बिंदू नामावली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गत वर्षभरापूर्वी नियम गुंडाळून नियुक्ती करण्यात आलेल्या सीएचबी प्राध्यापकांना मान्यतेच्या फायली जैसे थे आहेत. मात्र, आम्ही विद्यार्जनाचे काम केले. आम्हाला श्रमाचा मोबदला द्या, अशी मागणी सातत्याने सीएचबी प्राध्यापकांनी शैक्षणिक संस्थेकडे केली आहे.

‘रोस्टर’चे पालन नाही
शैक्षणिक संस्थानी सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करताना ‘रोस्टर’चे पालन केले नाही. त्यामुळे नियुक्तीला मान्यता नाही आणि वेतनही नाही, अशी त्यांची स्थिती आहे. चूक संस्थेची मात्र आर्थिक नुकसान झळ सीएचबी प्राध्यापकांचे होत आहे. सलग नऊ महिने विद्यार्जनाचे प्रतीतासिका ४५० रुपये मानधन मिळेल, या आशेने त्यांनी कर्तव्य बजावले. मात्र, एक रुपयाही त्यांना मिळाला नाही.

६० प्राध्यापकांना मानधन
सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात बिंदू नामावलीचे पालन करून नियुक्ती दिलेल्या १२ महाविद्यालयांतील ६० प्राध्यापकांना ३५ लाख २७ हजार ८१० रुपये मानधन वितरण करण्यात आले. अटी-शर्तींची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही सीएचबी प्राध्यापकांचे मानधन रोखण्यात येत नाही, अशी माहिती उच्च व शिक्षण विभागाचे सहसंचालक केशव तुपे यांनी ‘लोकमत’ला दिली.

 

Web Title: Two thousand professors' salaries' unlocked '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.