शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:साठी आणलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हदयरुग्णाने दिले भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

सामाजिक दातृत्वाचा संदेश, कोरोनाकाळात वंदे मातरम्‌ फाऊंडेशनचा जात-धर्मविरहित उपक्रम अमरावती : हृदयरुग्णांना कोरोनाचा धोका सर्वाधिक गणला गेला आहे. त्यामुळे ...

सामाजिक दातृत्वाचा संदेश, कोरोनाकाळात वंदे मातरम्‌ फाऊंडेशनचा जात-धर्मविरहित उपक्रम

अमरावती : हृदयरुग्णांना कोरोनाचा धोका सर्वाधिक गणला गेला आहे. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणून ठेवले. मात्र, तूर्तास आवश्यकता नसल्याचे पाहून तब्बल ६५ हजारांची ही यंत्रणा दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी सामाजिक संस्थेला भेट दिले. अशोकराव गायगोले असे या दानदात्याचे नाव आहे. कोरोनाकाळातील ही सर्वोत्तम भेट असल्याची प्रतिक्रिया वंदे मातरम्‌ फाऊंडेशनकडून देण्यात आली.

कोविड रुग्णांना बेड नाही. औषधी वेळेवर मिळत नाही. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत असल्याची ओरड आता प्रकर्षाने होऊ लागली आहे. त्यामुळे या आजाराची भीती स्वाभाविकच आहे. त्यामुळे या आजाराचा धोका टाळण्यासाठी औषधी व्यावसायिक अशोकराव गायगोले यांनी घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवले होते. ते पुरोगामी विचारसरणीचे खंदे कार्यकर्ते. त्यामुळे अशोकराव यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता जागा झाला आणि तूर्तास आपल्या कामात नसलेले ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर इतर गरजू रुग्णांच्या कामी यावे, यासाठी त्यांनी ११ मे या वाढदिवशी वंदे मातरम्‌ फाऊंडेशनकडे ही मशीन सुपूर्द केली. त्यांच्या अर्धागिनी दुर्गावती गायगोले यांनी त्यांच्या या निर्णयाला साथ दिली.

वंदे मातरम्‌ फाऊंडेशन ही संस्था गत नऊ वर्षांपासून मेळघाटात सामाजिक कार्यात अग्रणी आहे. परंतु, वर्षापासून कोरोनाने कहर केला आणि फाऊंडेशनने अमरावतीकडे रोख केला. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्याच्या कार्यात संघटनेने झोकून दिले आहे. ज्या कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाही, त्या रूग्णांच्या घरी जाऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लावून तात्पुरता दिलासा व ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्यास ती मशीन पुन्हा दुसऱ्या रुग्णास लावून देण्यासाठी ही संघटना जाती, धर्माच्या भिंती ओलांडून धडपडत आहे. या सामाजिक कार्यात वंदे मातरम् फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र दापूरकर, उपाध्यक्ष अमित जामोदे, सचिव रमेश धरमकर, कोषाध्यक्ष राहुल भोंडे, संजय शेकळे, हेमंत गावंडे, तुषार वरणगावकर हे कार्यरत आहेत. वंदे मातरम फाऊंडेशनने पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोळा करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यापैकी एक मशीन या सर्वांनी स्वत: खरेदी केली. आता अशोकराव गायगोेले यांच्याकडून त्यांना दुसरी मशीन मिळाली आहे. कोरोनाला हरवून माणुसकीचा वेलु गगनावरी जावा, ही सदिच्छा यानिमित्ताने गायगोले यांनी व्यक्त केली आहे.