रस्ता सुरक्षानिमित्त रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST2021-02-09T04:15:33+5:302021-02-09T04:15:33+5:30

अमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली ...

Organizing road safety rallies | रस्ता सुरक्षानिमित्त रॅलीचे आयोजन

रस्ता सुरक्षानिमित्त रॅलीचे आयोजन

अमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली.

राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू रस्ता अपघातात होत असतात. रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना कळावे, त्यांच्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य लीना कांडलकर यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. महाविद्यालयापासून इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी चौक या मार्ग रॅली नेण्यात आली. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी पूनम देशमुख यांनी विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षा नियम व त्यांचे महत्त्व पटवून दिले. या रॅलीमध्ये सीमा अढाऊ, वंदना भोयर, मिलिंद इंगळे, स्मिता जाधव, अनिल टाले यांनी सहभाग घेतला. विद्यार्थिनी या रॅलीमध्ये बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीकरिता सविता टिपरे, कल्याणी हाडाेळे, चंचल हिरडे, पूर्वा भुसारी, सोनल ताटे, शालिनी आठवले, डिलेश्वरी, ऐश्वर्या व रीया हजारे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Organizing road safety rallies