शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

दलालांनी कवडीमोल भावाने खरेदी केला संत्रा

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या मृग संत्र्याचे सद्यस्थितीत दर अठ्ठावीस हजार रुपये टन असे भाव आहेत.

लोकमत विशेषसुदेश मोरे अंजनगांव सुर्जीउन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या मृग संत्र्याचे सद्यस्थितीत दर अठ्ठावीस हजार रुपये टन असे भाव आहेत. याआधी विकला गेलेला आंबिया बहार संत्रा मात्र उत्पादक शेतकऱ्यांची दलालांनी कोंडी करुन दहा हजार रुपयांच्या आत विकण्यास त्यांना बाध्य केले. कोणत्याही परिस्थितीत दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळू नये यासाठी व्यापाऱ्यांच्या भेटी शेतकऱ्यांशी होऊ दिल्या नाहीत. हाच संत्रा शहरात किरकोळ विक्रीसाठी ४० रुपये किलो आणि मॉलमध्ये ६० रुपये किलो विकला गेला. शेतकऱ्यांना लुटून दलालांनी आंबिया बहरात मोठा नफा कमविला.संत्रा उत्पादकांच्या बागा मोठ्या प्रमाणात असलेल्या या परिसरात शीतगृह निर्मिती व बँकेची संत्रा फळासाठी तारण योजना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत दलालीच्या या समस्यांवर कोणताही उपाय नाही. फळ बागायतदारांचे बचत गट स्थापन करुन व्यवस्थापन आणि संत्रा ज्युस व फळविक्री केंद्र आदी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शीतगृह निर्मितीचा प्रयोग प्रत्यक्षरीत्या अमलात आणण्यासाठी व त्याची दैनंदिन देखभाल करण्यासाठी अत्यंत खर्चिक असल्यामुळे या क्षेत्रात बाजार समित्या धजावत नाहीत. नेमका याचाच फायदा घेऊन भाव पाडणे व एकत्र येऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी करणे हा दलालांचा नेहमीचा फंडा आहे. ज्यांना शेती कसण्याबाबत कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाही तेच लोक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डाका टाकून नफा कमावण्याचा प्रयत्न करीत असतात. विदर्भातील संत्राबागांचे विक्री व्यवस्थापनाकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. नव्या शासनाने यामध्ये लक्ष घालून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संघटना स्थापन करणे, विक्रीचे थेट ग्राहकापर्यंत नेटवर्क स्थापन करणे, हुंडी मध्ये संत्रा खरेदीवर बंदी आणून मेट्रिक टन पध्दतीने खरेदीचे बंधन घालणे, संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करणे, आदी उपाययोजनांची नव्या शासनाकडून अपेक्षित आहे. व्यापाऱ्यांना संत्रा विकून दलालांनी शेतकऱ्यांना लावला चुनापाचशे संत्रा झाडे असलेल्या बागेतील आंबिया बहराची फक्त सात हजार रुपये टनाने यावर्षी खरेदी झाली. पस्तीस टन माल निघालेल्या या बागेचे शेतकऱ्याला फक्त अडीच लाख रुपये मिळाले. हाच संत्रा दलालांनी मोठ्या व्यापाऱ्यांना अठरा हजार रुपये टनाने विकला. आणि पावणे चार चाख रुपये नफा कमाविला. बाजार ग्राहकांना हाच माल चाळीस रुपये किलोने विकून व्यापाऱ्यांनी साडेअकरा लाख रुपयांचा नफा मिळविला.