शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत अन्न प्रशासन विभागाची कारवाई

By admin | Updated: January 13, 2017 00:08 IST

अंबानगरीत जुन्या पिंपांमध्ये कमी दर्जाचे खाद्यतेलाची विक्रीचा गौरखधंदा सुरू आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून ही बाब लोकदरबारात मांडली होती.

भरारी पथक : दोन लाख ७० हजारांचे खाद्यतेल जप्त अमरावती : अंबानगरीत जुन्या पिंपांमध्ये कमी दर्जाचे खाद्यतेलाची विक्रीचा गौरखधंदा सुरू आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून ही बाब लोकदरबारात मांडली होती. या वृत्ताची दखल घेऊन गुरुवारी दुपारी ४ वाजता अन्न व प्रशासन विभागाच्या भरारी पथकाने व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करून कमी दर्जाचे २ लक्ष ६८ हजार रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. अंबानगरीतल किरकोळ खाद्यतेल विक्रेते मोठ्या प्रमाणात जुन्या पिंपांमध्ये तेल भरून विक्री करण्याचा धंदा त्यांनी थाटला आहे. तसेच विविध प्रकारच्या ब्रँडमध्ये कमी दर्जाच्या खाद्यतेलाच्या विक्रीचा व्यवसाय अनेक दिवसांपासून फोफावला आहे. कमी दर्जाचे खाद्यतेल खाणे नागरिकांच्या जिविताला अतिशय हाणीकारक आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये असलेले मेसर्स भुवनेशर रिफाईन कॉटन आईल प्रा.लि. सी ३० या कंपनीमध्ये अधिकाऱ्यांनी कारवाई करुन २ लाख ६८ हजार ७५३ रुपयांचे तेलसाठा जप्त केला आहे. या आईल कंपनीतून भूमी व सुपर या नावाने कमी दर्जाचे तेल विक्री होत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. त्या खाद्यतेलाच्या साठ्याचे वजन हे ३१०१ किलो गँ्रम ऐवढे होते. अन्न व प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. आर. केकरे व सहय्यक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रमुख अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी आर.एस. वाकडे यांनी ही कारवाई केली आहे. हा साठा जप्त करुन खाद्यतेलाचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार कलम २६ (२) (व्ही), अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. खाद्यतेलाचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या नमुन्यामध्ये दोषी आढळले तर कंपनीच्या संचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व प्रशासन विभागाचे सहय्यक आयुक्त जयंत वाणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)