शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून कामकाज

By admin | Updated: June 9, 2014 23:22 IST

शासन महापालिकेत स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद करण्याच्या विचाराधीन असून हा निर्णय कर्मचारी व शहर विकासाच्या हिताविरोधी असल्याचा आरोप करीत सोमवारी कर्मचार्‍यांनी काळी फित

अमरावती: शासन महापालिकेत स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद करण्याच्या विचाराधीन असून हा निर्णय कर्मचारी व शहर विकासाच्या हिताविरोधी असल्याचा आरोप करीत सोमवारी कर्मचार्‍यांनी काळी फित लावून कामकाज केले. एलबीटी बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाने महापालिकेतील उत्पन्नाचे स्त्रोत व कर्मचार्‍यांच्या वेतनाची हमी घ्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.महापालिका कर्मचारी संघाचे प्रल्हाद कोतवाल, मंगेश वाटाणे, मानविराज दंदे, गणेश तंबोले आदींच्या नेतृत्वात काळी फीत लावून शासन निर्णयाविरूध्द हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वी महापालिकेत जकात कर लागू करण्यात आला होता. मात्र शासनाने १ जुलै २0१२ पासून जकात कर हटवून त्याऐवजी एलबीटी सुरू केला. वर्षभराचा कालावधी सुरळीत जात नाही तेच एलबीटी बंद करण्याच्या घडामोडी शासनाने सुरू केल्या आहेत. हा निर्णय शासनाने व्यवसायिकांच्या हितासाठी घेण्याचे ठरविले असले तरी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी महापालिकेच्या उत्पन्नाची साधने आणि कर्मचार्‍यांच्या वेतनाची हमी शासनाने घ्यावी, अशी न्यायीक मागणी कर्मचार्‍यांची आहे. कर्मचार्‍यांच्या या मागणीला अधिकारीवंृदानेही जोरकसपणे पाठिंबा दर्शविला. अधिकार्‍यांनीसुध्दा काळी फित लावून कामकाज केले. महापालिकेत सर्वच विभागात कर्मचार्‍यांनी काळी फीत लावून कामकाज केल्याचे निर्दशनास आले.