शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनात एक हजाराची वाढ नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

संगणक परिचालक संतप्त, ऑनलाईनची कामे वाढली, गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन फोटो - चांदूर रेल्वे २९ एस चांदूर रेल्वे : ...

संगणक परिचालक संतप्त, ऑनलाईनची कामे वाढली, गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

फोटो - चांदूर रेल्वे २९ एस

चांदूर रेल्वे : ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांच्या वेतनात १४ जानेवारी रोजीच्या शासननिर्णयानुसार एक हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात ाआली. ही वाढ नामंजूर असल्याने ती नकोच, अशा आशयाचे निवेदन चांदूर रेल्वे येथील संगणक परिचालक संघटनेने सहायक गटविकास अधिकारी सुधाकर उमक यांना दिले आहे.

निवेदनानुसार, राज्यात सुमारे २० हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. २०११ मध्ये संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) व २०१६ मध्ये याच संगणक परिचालकाना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अंतर्गत केंद्रचालक हे पद देऊन नव्याने नियुक्ती देण्यात आली. शासननिर्णयानुसार एका केंद्रचालकासाठी दरमहा सहा हजार रुपये, स्टेशनरीकरिता २७०० रुपये, प्रशिक्षणाकरिता १३०० रुपये, व्यवस्थापनाकरिता ४५० व सेवा कर १८०० रुपये असे एकूण १२२५० रुपये कंपनी घेते. ग्रामपंचायत वर्षाकाठी १ लाख ४७ हजार रुपये कंपनीला देते. यातून केंद्रचालकाचे नियमित सहा हजार रुपये वेतन करणे अपेक्षित असताना, टीडीएसच्या नावाखाली काही रक्कम कापली जाते. आता सात हजार रुपये एकत्रित वेतन मिळेल, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले. संगणक परिचालकांच्या जखमेवर याद्वारे मीठ चोळण्यात आल्याचे संघटनेने नमूद केले.

निवेदन देताना सचिन पाटील, मंजूषा देशमुख, मयूरी ठाकरे, प्रीती नखाते, वैभव जळीत, आशिष चौधरी, अक्षय गडलिंग, रतन पारवे, विशाल खंडारे, सूरज सरोदे, तुकाराम पांडव, संदीप किन्हीकर, गोपाल घाटोळ व इतर परिचालक उपस्थित होते.

———————

कोरोनाच्या महामारीत तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा चालवणे कठीणच. त्यातही चार-चार महिने पगार होत नाहीत. यामुळे कर्जबाजारी होऊन उपासमार होणे कोणीही नाकारू शकत नाही.

- आशिष चौधरी, संगणक परिचालक

———————

प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा आम्हाला वेळेवर मानधन दिले जात नाही. प्रशासनाने सांगितलेली सर्व कामे संगणक परिचालक वेळेवर करीत आहेत. मात्र, रोहयोत काम करणाऱ्या मजुरापेक्षाही आम्हाला वेतन कमी आहे.

- मंजुषा देशमुख, सचिव,संगणक परिचालक संघटना, चांदूर रेल्वे

———————

संगणक परिचालक जोड

छाया - टाकरखेडा संभू

भातकुली पंचायत समितीत शासननिर्णयाची होळी

टाकरखेडा संभू : भातकुली पंचायत समिती कार्यालयासमोर संगणक परिचालकांनी शासननिर्णयाची होळी केली. घोषणाबाजी व निदर्शनांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तालुका उपाध्यक्ष संदीप टपके, प्रवीण तायडे, सुशांत लुंगे, राहुल सिरसाठ, पल्लवी राऊत, वीणा गोंडाणे, निरंजन बोंडे

आदींनी गटविकास अधिकारी सुरेश थोरात यांना निवेदन दिले.