शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, दिवसभरात दोन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:17 PM

अमरावती: जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दरदिवसाला वाढतच आहे. येथील कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या पाटीपुरा येथील एका ३० वर्षीय युवकाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दरदिवसाला वाढतच आहे. येथील कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या पाटीपुरा येथील एका ३० वर्षीय युवकाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. मसानगंज येथील एक ५० वर्षीय महिला व लालखडी येथील एक १९ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४२ एवढी झाली आहे. पाटीपुºयातील युवकाच्या मृत्यूने कोरोनाने दगावलेल्यांची संख्या १४ झाली आहे. ५० जण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.शहरात चार नवे कंटेनमेंट झोन घोषितकोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी शहरात नव्याने चार कंटेनमेंट झोन घोषित केले. यात वलगाव मार्गावरील मीठ कारखानच्या मागील बाजूस अलहिलाल कॉलनी, वलगाव मार्गावरील डी.एड. कॉलनी, हबीबनगर नंबर २ आणि रविनगरच्या मागील बाजूस असलेले वल्लभनगर यांचा समावेश आहे. या चारही झोनमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना अनावश्यक बाहेर जाता येणार नाही, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले. आतापर्यंत महानगरात २५ कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.मसानगंज हॉटस्पॉट सीलमसागंज परिसरात कोरोना संक्रमिताची संख्या वेगाने वाढत आहे. हा परिसर महापालिका प्रशासनाने हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे. परिणामी मसानगंज भागात येणारे चहुबाजुचे रस्ते, मार्ग सील करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्ती अथवा त्यांच्या वाहनांना प्रवेश मनाई आहे. या भागात आतापर्यंत २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस