शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

पुराने मुलांच्या स्वप्नाची धूळघाण केली !

By admin | Updated: August 1, 2014 00:05 IST

खेड येथील भारतराव तंबाखे हे भूमिहीन आहेत. मजुरीवर ते प्रपंच चालवितात. मुलगी बीएसी.सी ला शिकत आहे. दोन्ही मुलं मोर्शी येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. स्वप्नील याने नुकतीच पोलीस

रोहितप्रसाद तिवारी - मोर्शीखेड येथील भारतराव तंबाखे हे भूमिहीन आहेत. मजुरीवर ते प्रपंच चालवितात. मुलगी बीएसी.सी ला शिकत आहे. दोन्ही मुलं मोर्शी येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. स्वप्नील याने नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिली. या तिघाही भावांचे सर्व शैक्षणिक कागदपत्र घरकूल योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात होते. २७ जुलै रोजी पाऊस सुरु होता. गावा शेजारुन गेलेली चारघढ नदी दुथडी वाहत होती. तथापि पुराचे पाणी बाजार ओळीत शिरेल याची जराशीही कल्पना बाजार ओळीतील नागरीकांना नव्हती. अचानक पूर वाढला, नदी काठ तोडून चारघढ नदीच्या पूराचा लोंढा बाजार ओळीत शिरला त्याने बाजार ओळीतील घरे आपल्या कवेत घेतले. घरातील सामान नेण्याचीही उसंत पुराने दिली नाही. अंगावरील नेसत्या वस्त्रानिशी भारतराव तंबाखे कूटूंब कंबरभर पूरातून बाहेर पडले. या पुरामुळे त्यांचे घर पूर्णत: वाहून गेले. उरल्या फक्त दोन पडक्या भींती, त्या सुध्दा पुराच्या दलदलीत पडण्याच्या स्थितीत आल्या.या पुरामुळे त्यांच्या घरातील जवळपास साडेचार क्विंटल अन्नधान्य, आणि प्रपंचाकरिता आवश्यक असलेले सर्व साहित्य वाहून गेले. पिण्याचा पेलाही त्यांच्याकडे आज शिल्लक राहिला नाही. नोकरीकरिता प्रयत्न करीत असलेल्या स्वप्नीलसह, त्यांच्या दोन्ही मुला-मुलीचे सर्व शैक्षणिक कागदपत्र सुध्दा या पुरात वाहून गेले. पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करण्यात आणि भविष्यात दुय्यम प्रतीच का? मूळ प्रती कोठे गेल्या याचे उत्तर देता-देता या कूटूंबातील मुलांच्या नाकी नउ येणार आहे. सध्या तंबाखे कुटूंब ग्रामपंचायतीच्या आश्रयाला आहे. तथापि हा आश्रय केव्हापर्यंत मिळेल याविषयी त्यांना चिंता लागली आहे. बाजार ओळीत भविष्यातही पूर येणार असल्याचे बाजार ओळीत राहणाऱ्यांना भीती आहे, शासनाने सुयोग्य ठिकाणी त्यांना पून्हा घरकूल योजनेत घर बांधून देवून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तंबाखे कुटुंबीय करीत आहे.