शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात विद्यार्थ्यांचे पोषण, शिक्षकांचे शोषण

By admin | Updated: September 21, 2014 23:43 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळेतील मध्यान्ह भोजनाचा आस्वाद मुले घेतात. शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असली तरी शिक्षकांचे शोषण करणारी ठरत आहे.

सुखदेव पवार - चमकशालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळेतील मध्यान्ह भोजनाचा आस्वाद मुले घेतात. शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असली तरी शिक्षकांचे शोषण करणारी ठरत आहे.शाळेतील मध्यान्ह भोजनाचा आस्वाद मुले घेतात. याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली की, आजची खिचडी कशी झाली. सामूहिक उत्तर आले, चांगली झाली सर. पण, या उत्तरातूनच एका इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने धीटपणे उभी राहून कृतज्ञता व्यक्त केली. तिने डोळ्यातील आस्वाने ओघड पुसत हृदयातील शब्दाला वाचा फोडली. सर, ''खिचडी चांगली नाही. एक महिन्यापासून मी नुसती खिचडीवर जगते आहे. रविवार आम्हाला उपवास जातो.'' यातून एक सत्य बाहेर आले की, ही मुलगी शिक्षणासोबतच पोषण आहारासाठी पण शाळेत येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाभदायी योजनेतील चांगली योजना म्हणून पोषण आहार योजना राज्यभर राबविली जात आहे.या योजनेतील अडथळे शोधण्यासाठी किंवा त्याहीपेक्षा ती योजना अधिक चांगल्या रितीने कशी राबविली जाईल यासाठी नुकताच अमरावती जिल्ह्यात राज्य समीक्षा पथकाची स्थापना केली आहे. या पथकाच्या निरीक्षणातूून अनेक गोष्टी बाहेर येतील व त्यावर योग्य त्या उपाययोजना शासनाला करता येती, यामागील उद्देश. ही योजना राबवीत असताना शिक्षकांवर टाकलेली जबाबदारी विद्यार्थ्यांच्या आहारासंबंधीत असल्यामुळे चांगला सकस आहार कसा देता येईल, ही शिक्षकांची धडपड असते. हे सर्व करीत असताना त्याचे शैक्षणिक कार्य काहीअंशी बाजूला राहते. त्यासाठी शिक्षकांना शैक्षणिक कार्य बाजूूला ठेवून पूर्ण लक्ष विद्यार्थ्यांना वाटप होणाऱ्या पोषण आहारावर केंद्रित करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष होते. यासाठी पोषण आहार योजना राबविण्यासाठी दुसरी यंत्रणा शासनाने कार्यान्वित करावी, अशी मागणी जोर धरुलागली आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण होण्यासाठी अधिक कॅलरीजची आवश्यकता आहे. निरनिराळ्या प्रकारचे धान्य जर शासन पाठवीत राहिले तर दररोजचा मेनू बदलत राहील. कार्यान्वित असलेली किचन शेडची मागणी त्वरित पूर्णत्वास गेल्यास धान्य शिजविण्यासाठी स्वच्छ परिसर प्राप्त होऊ शकेल. ही योेजना राबविताना पुरक आहारावर येणारा व भाजीपाला वापरताना कसरत करावी लागते. ही योजना चांगली राबविण्यासाठी स्वयंपाकीन व मदतनीस यांच्या वेतनात वाढ केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.