शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत आता सदस्यांना ‘टॅब’

By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST

महापालिकेचे कामकाज पेपरलेस आणि गतिमान होऊन सदस्यांना एका क्लिकवर जग कळावे, यासाठी आता लॅपटॉपऐवजी ‘टॅब’ देण्यााचा प्रस्ताव रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांचा आहे.

अमरावती : महापालिकेचे कामकाज पेपरलेस आणि गतिमान होऊन सदस्यांना एका क्लिकवर जग कळावे, यासाठी आता लॅपटॉपऐवजी ‘टॅब’ देण्यााचा प्रस्ताव रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांचा आहे. अर्थसंकल्पानंतरच्या आमसभेत याअनुषंगाने प्रस्ताव सादर केला जाणार आहे.महापालिकेच्या मागील सत्रात दंदे यांच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने नगरसेवकांना लॅपटॉप देण्यात आले होते. चालू सत्रात ९२ पैकी ७६ सदस्यांनी लॅपटॉप घेतल्याची नोंद संगणकीय विभागात आहे. १६ सदस्यांनी लॅपटॉप घेतले नाही. परंतु ज्या उद्देशाने सदस्यांना लॅपटॉप देण्यात आले आहे, तो उद्देश पूर्ण होत आहे की, नाही हा संशोधनाचा विषय आहे. हल्ली महापालिकेत सदस्यांना वाटप करण्यात आलेले लॅपटॉप कालबाह्य झाले आहे. त्यामुळे नव्या रुपात, अद्ययावत माहिती असलेले ७ किंवा ८ इंचीचे ‘टॅब’ सदस्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आणला जात आहे. लॅपटॉपच्या तुलनेत टॅब हे स्वत: आणि हाताळणे सोयीचे असल्याने या प्रस्तावाला कुणाचा विरोध देखील राहणार नाही, असे प्रदीप दंदे म्हणाले. प्रशासनासोबत पत्रव्यवहार, शासन निर्णय, जगाची माहिती कळण्यासाठी टॅब अतीशय लाभदायक ठरेल, असे दंदे यांचे म्हणने आहे. सभेत हा प्रस्ताव आणण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. सदस्यांकडे असलेले लॅपटॉप परत घेवून त्याचा लिलाव करुन येणाऱ्या रक्कमेत टॅब खरेदी करता येणार आहे. झपाट्याने बदलत चाललेल्या काळानुसार सदस्यांनाही कामकाजात गती आणणे आवश्यक आहे. त्याकरीताच हा प्रस्ताव पुढे आणला जात आहे. लॅपटॉपचे आयुष्य संपुष्टात आले आहे. (प्रतिनिधी)