शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

- आता 'मिनी वाईनबार'वर पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: August 25, 2014 23:41 IST

शहरातील अंडी विक्रीच्या नावाखाली दारू पिणाऱ्यांची सोय करणाऱ्या हातगाड्यांविरुध्द पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी कारवाईचे आदेश दिले असून यापुढे या गाड्या पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत.

अमरावती : शहरातील अंडी विक्रीच्या नावाखाली दारू पिणाऱ्यांची सोय करणाऱ्या हातगाड्यांविरुध्द पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी कारवाईचे आदेश दिले असून यापुढे या गाड्या पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत. ‘हातगाड्या की मिनीवाईन बार’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत करताच पोलीस आयुक्तांनी या वृत्ताची तातडीने दखल घेतली. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला अथवा खुल्या जागेवर अंडी विक्री करणाऱ्या हातगाड्या सायंकाळी ग्राहकांच्या सेवेत रूजू होतात. या हातगाड्यांभोवती दारू पिणाऱ्यांचीच खरी गर्दी असते. हातगाडीचालक परिसरातच दारू पिण्यासाठी खुबीने व्यवस्था उपलब्ध करून देतो. काही अंड्यांच्या हातगाड्यांवर मटन करी व जेवनाची व्यवस्थाही आहे. याचाच फायदा घेत मद्यपी अशा हातगाड्यांना पहिली पसंती दर्शवून बिनधोकपणे दारू रिचवितानाचे चित्र रात्री पहावयास मिळते. काही हातगाड्यांवर तर उशीरा अथवा ‘ड्राय डे’ला दारू विक्री होत असल्याचे यापूर्वीच्या पोलीस कारवाईतूनही स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ठळकपणे पुराव्यानिशी वृत्त प्रकाशीत करताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी या वृत्ताची दखल घेत अशा हातगाड्यांविरुध्द तातडीने कारवाईचे आदेश सर्व पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेता केवळ अंडी विक्रीच्या हातगाड्यांना लक्ष्य करणे कठीण जाते. यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणेही गरजेचे आहे, असा सल्लाही मेकला यांनी नागरिकांना दिला आहे. सणासुदीमुळे तीन विशेष पोलीस पथक तयार केले असून कारवाईचा सपाटा सुरु केला आहे.