शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘मुख्यमंत्र्यांचे आजोळ’ अमरावतीची नवी ओळख

By admin | Updated: October 29, 2014 22:42 IST

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आजोळ अशी नवी ओळख आता अंबानगरीला मिळणार आहे. भाजपचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविणारे देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ अमरावतीचेच. येथील

गडकरींचेही मामेकुळ : समान व्यक्तिमत्त्वाच्या धुरीणांनी घालविले बालपणअमरावती : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आजोळ अशी नवी ओळख आता अंबानगरीला मिळणार आहे. भाजपचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविणारे देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ अमरावतीचेच. येथील चंद्रकांत कलोती हे फडणवीसांचे मामा आहेत. ना. नितीन गडकरी हेदेखील एक महत्त्वाचे नेते. त्यांचेही मामेकुळ अमरावतीचेच. रहाटगावकर पांडेंच्या घरी त्यांचे सतत येणे-जाणे. फडणवीस आणि गडकरी यांच्या व्यक्तिमत्वातील साम्य बघता या दोघांचे आजोळही एकच असणे हा अमरावतीकरांसाठी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. गडकरी, फडणविसांची जोडी गुरू-शिष्यांची जोडी म्हणविली जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही बरेच साम्य आहे. दोघेही अभ्यासू, व्यासंगी आणि दोघेही अजातशत्रू! अमरावतीच्या मातीत बागडलेले हे दोन दिग्गज केंद्र आणि राज्यातील सत्तांतरानंतर अत्यंत महत्त्वाची पदे भूषवित आहेत. नितीन गडकरी केंद्रात विराजमान असून देवेंद्र फडणवीस आता राज्याची धुरा पेलणार आहेत. मंगळवारी भाजप विधिमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणविसांच्या नावावर शिक्कामोर्तब करताच येथील बालाजी प्लॉट स्थित सीताराम बाबा मंदिर परिसरातील कलोती या फडणविसांच्या मामांच्या घरी जल्लोष साजरा झाला. गेल्या रविवारी नितीन गडकरी अमरावती येथे त्यांच्या मामांकडे दिवाळीनिमित्त येऊन गेलेत. दरवर्षी दिवाळीत मामांकडे येण्याचा गडकरींचा हा शिरस्ता भाजपचे कार्यकर्ते असल्यापासून केंद्रीय मंत्री असतानासुद्धा कायम आहे. मामाचे गाव प्रत्येकाच्याच आवडीचे असते. फडणविसांच्या मामांकडेही त्यांच्या अनेक सहृद्य आठवणी आहेत. त्यांच्या बालपणीचे अनेक किस्से आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याचे सांगून त्यांचे मामा आणि इतर नातलग गदगद होत आहेत. अमरावतीसाठीही ही गौरवाची बाब आहे. अवघ्या दीडशे किलोमीटरवर मुख्यमंत्र्यांंचे गाव आणि अमरावतीत आजोळ, क्या कहना!