शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: दुसऱ्या लाटेतील नव्या घातक स्ट्रेनचा अमरावतीतून नव्हे, राजस्थानातून उगम; ७० टक्के नमुन्यात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:20 IST

डिसेंबर २०२० मध्ये सर्वप्रथम नोंद, ७० टक्के नमुन्यात बदल

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नवा घातक स्ट्रेनसाठी अमरावती हे नाव पुढे आले असले तरी राजस्थान येथे डिसेंबर २०२० मध्येच तो आढळून आला होता. तशी नोंद हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) यांनी केल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोविड-१९ नमुने चाचणी प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

ठाकरे म्हणाले की, डबल म्युरेअन म्युटंट ‘ई४८४क्यू’ व ‘एल४५२आर’ हे आहेत. यात एकूण १५ म्युरेअन असून, हा विषाणूचा एक भाग आहे. आतापर्यंत सहा म्युरेअन आढळले आहेत. दोन म्युरेअन महत्त्वाचे आहेत. ‘डबल म्युरेअन म्युटंट’ हा डिसेंबर २०२० मध्ये आढळून आला. हा नवा स्ट्रेन नाही. हल्ली ७० टक्के नमुन्यात तो आढळत आहे. त्याचा उगम अमरावतीचा नाही, अशी पुष्टीही ठाकरे यांनी केली. कोरोना संसर्गाचा वेग वाढला

अमरावती जिल्ह्यात मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत एक लाखांवर नमुन्यांची चाचणी केली आहे. एका सदस्याला लागण झाली की, संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आढळते. संक्रमणासह मृत्यूदरही वाढत आहे. प्रत्येक महिन्यात कोरोनाच्या विषाणूत जनुकीय बदल होत आहेत. याबाबत (व्हेरिअंट ऑफ कन्सल्ट) विश्लेषण करण्यात येत आहे. नमुने पुण्याला पाठवित असल्याचे त्यांनी सांगितले. 

हिंगोली, अकोला येथेही आढळला दुसरा स्ट्रेन 

आतापर्यंत ‘डबल म्युरेअन म्युटंट’ हा ग्रीस, यूके येथेही आढळून आला आहे. त्याचा उगम अमरावती येथून झाला, असे म्हटले जात असल्याने विदर्भात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दुसरा स्ट्रेन हिंगोली, अकोला येथेही आढळून आला आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये, मास्कचा वापर करावा, नियमित हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे आणि कोरोनाला पळवावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती