शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाचा नियोजित विवाह उरकला

By admin | Updated: November 16, 2015 00:24 IST

मूळचा लेहेगाव येथील एका सैनिकाचे नियोजित लग्न मूर्तिजापूर तालुक्यातील अंभोरा येथे सोमवारी सकाळी उरकले.

अमरावती : मूळचा लेहेगाव येथील एका सैनिकाचे नियोजित लग्न मूर्तिजापूर तालुक्यातील अंभोरा येथे सोमवारी सकाळी उरकले. मात्र, आपण सदर सैनिकाची पहिली पत्नी असल्याचा दावा करणारी महिला रविवारी दिवसभर आपल्याला न्याय मिळण्यासाठी खल्लार पोलीस ठाण्यात बसून होती. मात्र, तिच्याकडे पहिले लग्न झाल्याचा कुठलाही पुरावा नसल्याने व हे प्रकरण शेगाव तालुक्यातील असल्याने खल्लार पोलिसांनी शेगाव पोलिसात या प्रकरणाचा चेंडू टोलवल्याचे कळते. शनिवारी खल्लार येथील नवरदेवाची घोड्यावर वरात निघाली. परंतु या नवरदेवासोबत आपले एक वर्षापूर्वीच शेगाव येथे लग्न झाल्याचा दावा करणाऱ्या महिलेने दर्यापूर पोलिसात धाव घेतल्याने येथील एका उपनिरीक्षकाच्या मदतीने नवरदेवाला अर्ध्यावरातीतूनच तपासासाठी ताब्यात घेतले होते. शनिवारी खल्लार येथे एकच खळबळ उडाली. परंतु नवरदेवाला नंतर सोडून देण्यात आले. त्याने मूर्तिजापूर तालुक्यात आपल्या नियोजित वधूसोबत विवाह करुन त्या नववधूला खल्लार येथे आणले. परंतु त्याची पहिली पत्नी असल्याचे सांगून खल्लार पोलिसात तिने धाव घेतल्याने आज दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. परंतु तिच्याकडे त्या नवरदेवासोबत पहिले लग्न झाल्याचा कुठलाही पुरावा नसल्याने व घटनास्थळ शेगाव असल्याने खल्लार पोलिसांनी सदर महिलेची समजूत काढून तिला शेगाव येथे तक्रार देण्यास सांगितले. (प्रतिनिधी)