शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई दु्रतगती महामार्ग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार

By admin | Updated: September 13, 2016 00:17 IST

राज्य शासनाने सरकारचा सन २०१३ चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत नव्याने मंजूर केलेला नागपूर- मुंबई दु्रतगती शिघ्रसंचार महामार्ग ...

पत्रपरिषद : वीरेंद्र जगताप यांचा आरोप, १४ ला धरणे आंदोलनअमरावती : राज्य शासनाने सरकारचा सन २०१३ चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत नव्याने मंजूर केलेला नागपूर- मुंबई दु्रतगती शिघ्रसंचार महामार्ग हा अमरावतीसह विभागातील तमाम शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठीचे षड्यंत्र असल्याचा आरोप आ.वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. सोमवारी ते जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.नागपूर - मुंबई हा दोन महानगरांना तासी १५० किमी वेगाने जोडणाऱ्या महामार्गाकरिता जमीन भूसंचयन अधिग्रहणाच्या कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांतून २ हजार ३५१ शेतकऱ्यांची पाच हजार हेक्टर जमीन २५७ किमीच्या रस्त्याकरिता घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना सहभागी करून दहा जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतून जाणारा रस्ता २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र शेतकऱ्यांना दाखविलेले स्वप्न शेतकरी शेतमजुरांचे विघ्न ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने या महामार्गासाठी शेतजमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार भागीदार पद्धतीच्या प्रकल्पाकरिता बाधित शेतकऱ्यांच्या ७० टक्के सहमतीची गरज असताना शासनाकडून लाभाच्या-लोभाच्या योजनांचे गाजर दाखविले जात असल्याचा आरोप तुकाराम भस्मे यांनी केला आहे. या नव्या महार्गाला समांतर पूर्वीच दोन महामार्ग उपलब्ध असताना याच दोन शहरांना जोडणाऱ्या नव्या महामार्गाची गरज काय, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. या रस्त्याच्या शेतजमिनी अधिग्रहण करण्याला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शासन अधिग्रहण, भूसंचयन करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद करणाऱ्या शासनाच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय हक्कासाठी हा लढा असल्याचे जपताप म्हणाले. यासाठी विभागातील बाधित शेतकरी व शेतमजुरांच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विशेष धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.जगताप, आ.अमित झनक, रणजित कांबळे, अमर काळे, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, तुकाराम भस्मे, व अन्य नेते उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला जि.प. अध्यक्ष सतीश उईके, तुकाराम भस्मे, प्रमोद तऱ्हेकर, मोहन पाटील आदी उपस्थित होते.