शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने ग्राहकांकडून वसूल केले एलबीटीचे ६.३५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST

अमरावती : महापालिकेद्वारा दोन वर्षाच्या एलबीटीसाठी ६.३५ कोटींची आकारणी महावितरणकडे करण्यात आली होती. ही रक्कम महावितरणद्वारा बिलामध्ये नोंद करून ...

अमरावती : महापालिकेद्वारा दोन वर्षाच्या एलबीटीसाठी ६.३५ कोटींची आकारणी महावितरणकडे करण्यात आली होती. ही रक्कम महावितरणद्वारा बिलामध्ये नोंद करून ग्राहकांकडून वसूल करण्यात आली. मात्र, भरणा दोन वर्षांनी केला. यासाठी नियमानुसार दुप्पट आकारणी करण्यात आलेली आहे. ही १३.६५ कोटींची थकबाकी महावितरणकडे असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

महावितरणकडे याशिवाय शहरातील कार्यालयांच्या मालमत्ता करापोटी २.८९ कोटींची देयकेदेखील बाकी आहेत. अशी एकूण १६.५४ कोटींची थकबाकी सद्यस्थितीत आहे. १३.६५ कोटींच्या थकबाकीसाठी एका कार्यालयाला जप्तीची नोटीस बजावली आहे. १५ दिवसांच्या मुदतीत थकबाकीचा भरणा न केल्यास त्या कार्यालयाचा लिलावदेखील केला जाऊ शकतो, याबाबत नियमात प्रावधान असल्याची माहिती कर निर्धारक अधिकारी महेश देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

महापालिका ही पथदिव्यांच्या देयकाचा भरणा करून नागरिकांना मोफत सेवा देते. याऊलट महावितरण ही कंपनी अगदी शेवटच्या घटकापर्यंत जी सेवा देते त्या बदल्यात बील वसूल करते. तीनही वीज कंपन्यांना ज्या कर आकारणीतून वगळण्यात आले आहे व याबाबत राज्य शासनाच्या २० डिसेंबर २०१८ निर्णयानुसार जी सूट देण्यात आलेली आहे त्यावर महापालिकेद्वारा कुठल्याही करांची आकारणीच करण्यात आलेली नाही. याबाबत नगरविकास विभागाचा कोणताही आदेश नसल्याचे महापालिका प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

नियामक आयोगाचा महापालिकेच्या बाजूनेच निकाल

महापालिकेद्वारा सन २०१४-१५ व १५-१६ या वर्षाकरिता ६.४३ कोटींच्या एलबीटीची आकारणी महावितरणला करण्यात आली. याविरुद्ध महावितरणने राज्य नियामक आयोगाकडे अपील केले होते. याचा निकालदेखील महापालिकेच्या बाजूने लागल्यानंतर महावितरणने ४ ऑगस्ट २०१८ रोजी ६.२३ कोटींची रक्कम पथदिव्यांच्या देयकांमध्ये समायोजित केल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

बॉक्स

यापूर्वी महावितरणला दिली २०० कोटींची सूट

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत शहरात २३६ किमी लांबीचे रस्ते खोदकामासाठी किमान २०० कोटींची सूट देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. यात डांबरी, काँक्रीट, पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खोदकामासाठी ९९०० रु प्रतिमीटर व ४९५ रुपये प्रतिमीटर सुपरव्हिजन चार्जेस असताना डांबरी रस्त्यांसाठी फक्त ७५ रुपये, काँक्रीट रस्त्यासाठी १०० रुपये व पेव्हिंग ब्लॉक रस्त्यांसाठी १०० रुपये प्रतिमीटर अशी आकारणी करून सूट देण्यात आली होती, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

बॉक्स

महावितरणकडे असणारी थकबाकी नियमानुसार आहे. एलबीटीच्या रकमेवर शास्ती व मालमत्ता कराची आकारणीची आहे. महावितरणच्या थकीत बिलांचा भरणा करण्यात येईल, अद्याप समायोजनाचा प्रस्ताव नाही.

- प्रशांत रोडे,

आयुक्त, महापालिका

कोट

महापालिकेच्या एलबीटी रकमेचा यापूर्वीच भरणा करण्यात आलेला आहे. या रकमेवर महापालिकेद्वारा दंडाची आकारणी करण्यात आली. याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संवाद सुरू आहे.

- आनंद काटकर,

कार्यकारी अभियंता,

वीज महावितरण