शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

एमपीएससीच्या १४६ वनक्षेत्रपालांची कसरत, एपीसीएफची नियमांना बगल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 4:03 PM

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे.

अमरावती - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे. हा अफलातून प्रकार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन) यांच्या निर्णयामुळे झाला आहे.शासन निर्णय सन २०१४ नुसार एमपीएसीतून निवडलेल्या वनपरिक्षेत्रपालांना १८ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून तसे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर विभागात त्या पदावर जबाबदारी नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, एपीसीसीएफ ए.आर. मंडे यांनी शासन नियमांचे धिंडवडे काढलेत. एमपीएसीतून निवडलेल्या १४६ आरएफओंपैकी ९० जणांना मोक्याच्या जागी नियुक्ती देण्याचा प्रकार चालविला आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्याशिवाय कर्तव्याची जबाबदारी देऊ नये, असे शासन आदेश आहे. तथापि, एपीसीसीएफ मंडे यांनी वनविभागाचे सामान्य प्रशासन हे खासगी मालकी म्हणून कारभार चालविला आहे. प्रशिक्षणविना आरएफओंना थेट पोस्टींग याबाबत तत्काली मुख्यवनसंरक्षक  भगवान यांनी नाराजी व्यक्त केली होती, हे विशेष.

आयएफएस लॉबी हैराणनागपूर वनबल येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन) ए.आर. मंडे यांच्या एककल्ली कारभारामुळे राज्यातील इतर भारतीय वन सेवा (आयएफएस) लॉबी हैराण झाल्याचे बोलले जात आहे. सामान्य प्रशासन हा विभाग अतिमहत्त्वाचा असल्याने येथे चौफेर विचारशील अधिकारी असणे अनिवार्य आहे. परंतु, एपीसीसीएफ मंडे हे सामान्य वनकर्मचाºयांचे प्रश्न, समस्या सोडवित नाही. त्यांच्या एकाकी निर्णयामुळे वनविभागाची बदनामी होत असल्याने आयएफएस लॉबी त्रस्त झाली आहे.

वनपाल ते वनक्षेत्रपाल पदोन्नती केव्हावनपाल ते वनक्षेत्रालांना पदोन्नती देण्यासंदर्भात वरिष्ठ वनाधिकाºयांची बैठक (डीपीसी) आॅक्टोंबर २०१७ मध्ये होणे आवश्यक होते. आता मार्च २०१८ मध्ये डीपीसी होते किंवा नाही?  याबाबत साशंकता आहे. डीपीसी झाल्याशिवाय रिक्त पदे, सरळसेवेची पदे आणि न भरलेली पदे यांचा ताळमेळ बसविता येणार नाही. असे असतानासुद्धा एपीसीसीएफ मंडे यांनी त्याकरिता कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे वनपालांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होत आहे.

आरएफओंच्या नोंदवहीत घोळ एमपीएससीमार्फत निवडलेल्या वनक्षेत्रपालांनी परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्यापेक्षा नियुक्तीच्या घिकाणी खुर्चीला चिटकून आहेत. परंतु प्रशिक्षणाचा १८ महिन्यांचा कालावधी दर्शविताना दैंनदिन कामे आणि परीविक्षाधीन कार्य जुळवून दाखवित असल्याने नोंदवहीत प्रचंड घोळ सुरू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावती