शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुपरस्पेशालिटी २ मध्ये मॉड्युलर ‘ओटी’

By admin | Updated: March 14, 2016 00:10 IST

येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टप्पा २ च्या इमारतीत तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून मॉड्युलर ओटी (शल्यगृह) साकारले जाणार आहे.

दोन कोटींचा खर्च : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश लोकमत विशेषप्रदीप भाकरे अमरावतीयेथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टप्पा २ च्या इमारतीत तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून मॉड्युलर ओटी (शल्यगृह) साकारले जाणार आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी) टप्पा २ च्या इमारतीमधील मॉड्युलर शल्यगृहाचे नूतनीकरण करण्यासाठी १ कोटी ९० लाख ४१ हजार ५२० रुपयांच्या अंदाजपत्रकासह आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. गुरुवारी यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचा दुसऱ्या टप्पा सुरू झाल्यानंतर येथे विविध रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अमरावती विभागातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रुग्णालय महत्त्वपूर्ण आहे. येथे अतिशय क्लिष्ट पद्धतीने मेजर आणि सुपरमेजर शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे तेथील उपचारांवर मर्यादा आली आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी टप्पा २ या इमारतीत अत्याधुनिक शल्यगृह उभारले गेल्यास मनुष्यबळाशिवाय ते कार्यान्वित होणार नाही. त्यामुळे टप्पा दोनमधील पदभरतीसह अत्याधुनिक यंत्रसामुग्री या इमारतीत केव्हा येईल, याकडे विभागीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे. संदर्भसेवा रूग्णालयातील मॉड्युलर शल्यगृहाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवेच्या संचालकांना शासनाकडे सादर करावा लागणार आहे. पदभरतीसाठी रखडले कार्यान्वयनसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी पदस्थापना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार समितीला दिले होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान स्थानिक आमदार सुनील देशमुख यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता. त्यावर एक महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असताना ३ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्यापही पदभरती झालेली नाही आणि त्यामुळे ४५ कोटी रुपये खर्च होऊनही ही वास्तू नागरिकांच्या आरोग्यसेवेत रुजू झालेली नाही. २९० पदांची आवश्यकतासुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले आहे. इमारतीच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. या रुग्णालयात साधनसामग्री आणि २९० पदनिर्मिती करावी लागणार आहे. पदनिर्मितीचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडून एकदा परत आला आहे. या हॉस्पिटलसाठी २० प्रकारची यंत्रसामग्री लागणार आहे. या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास आरोग्यसेवेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हृदयरोग, कर्करोग उपचारसुपर स्पेशालिटी टप्पा-२ मध्येही हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया विभाग, अतिविशिष्ट शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. सन २००८ मध्ये सुपर स्पेशालिटी रूग्णालय सुरू झाल्यापासून किडनीच्या आजारासह अन्य रोगांवरील उपचारांसाठी अमरावती विभागासह मराठवाडा, बैतुल व छिंदवाडा या जिल्ह्यातील रुग्णही येथे येतात. या पार्श्वभूमिवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचा दुसरा टप्पा जनतेच्या सेवेत रुजू व्हावा, यासाठी राजकीय प्रयत्नांची गरज आहे.