शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संतापले, बैठक संपेपर्यंत अभियंत्याला जमिनीवर बसविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

भातकुली तालुक्यातील तक्रारींचा मुद्दा उपस्थित झाला. पाणीपुरवठ्याच्या जबाबदाºया शाखा अभियंत्यांवर क्षेत्रनिहाय निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भातकुलीशी संबंधित शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना पाणी वितरणाचे वेळापत्रक माहिती नव्हते. पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठीचे निगराणी पथकही निष्क्रिय असल्याचे लक्षात आले. पाणी सोडणाऱ्यांना वाटले तर पाणी सुटते, अन्यथा दांडी मारली जाते, हे वास्तव उपस्थितांच्या नजरेत आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीपुरवठ्यासंबंधीच्या बैठकीत शाखा अभियंत्याला बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांनी जमिनीवर बसण्याची शिक्षा फर्मावली. हा अफलातून प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मंगळवारी घडला.पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित असल्याच्या अनुषंगाने आमदार रवि राणा यांनी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि जीवन प्राधिकरणाची संयुक्त बैठक घेतली.भातकुली तालुक्यातील तक्रारींचा मुद्दा उपस्थित झाला. पाणीपुरवठ्याच्या जबाबदाºया शाखा अभियंत्यांवर क्षेत्रनिहाय निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भातकुलीशी संबंधित शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना पाणी वितरणाचे वेळापत्रक माहिती नव्हते. पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठीचे निगराणी पथकही निष्क्रिय असल्याचे लक्षात आले. पाणी सोडणाऱ्यांना वाटले तर पाणी सुटते, अन्यथा दांडी मारली जाते, हे वास्तव उपस्थितांच्या नजरेत आले. आमदारांनी शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना जबाबदार धरले. त्यांना बोलवून प्रचंड संताप व्यक्त केला. कान धरून बसायला सांगितले. वजन जास्त असल्यामुळे कान धरताना अभियंत्याचा तोल गेला. ते कलंडले. मग आमदारांनी बैठक होईपर्यंत त्यांना खाली बसण्याची शिक्षा फर्मावली. शाखा अभियंत्यानेही ती स्वीकारली. दोन दिवसांत समस्या न सुटल्यास पुरोहित यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता सुरेश चारथड यांना आमदारांनी दिले. दरम्यान, पुरोहित यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे चारथड यांनी सांगितले. पुरोहित यांनी, प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. आमदार रवि राणा यांनी घटनेला दुजोरा दिला. लोकांची कामे न करणाºया अधिकाºयांना यापुढेही वठणीवर आणले जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :MLAआमदार