राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्रींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 14:18 IST2022-03-12T14:16:13+5:302022-03-12T14:18:12+5:30

माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे

Minister of State Bachchu Kadu's mother dies in age of 84 year old | राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्रींचे निधन

राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्रींचे निधन

मुंबई - प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्री इंदिराबाई कडु यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. स्वत: बच्चू कडु यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. इंदिराबाई यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  

माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मातोश्रींच्या पार्थिवावर उद्या रविवार १३ मार्च २०२२ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चादुंर तालुक्यातील बेलोरा या गावी सकाळी १० वाजता अंत्यविधी होईल, अशी माहितीही कडु यांनी दिली आहे. 

Web Title: Minister of State Bachchu Kadu's mother dies in age of 84 year old