शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

हातगाड्या की मिनी वाईनबार ?

By admin | Updated: August 24, 2014 23:11 IST

शहरातील आमलेट-पावच्या हातगाड्यांवर सायंकाळनंतर मद्यप्रेमी सर्रास मद्य प्राशन करीत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अलीकडे अंड्यांच्या काही गाड्यांवरून सर्रास दारूविक्रीही केली जात

पोलिसांचे दुर्लक्ष : रस्त्यावर दारुची खुलेआम विक्रीवैभव बाबरेकर - अमरावतीशहरातील आमलेट-पावच्या हातगाड्यांवर सायंकाळनंतर मद्यप्रेमी सर्रास मद्य प्राशन करीत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अलीकडे अंड्यांच्या काही गाड्यांवरून सर्रास दारूविक्रीही केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या एका पाहणीत उघडकीस आले. राजापेठ व कोतवाली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर रात्री थाटल्या जाणाऱ्या या गाड्यांवर रात्री वाढणारी वर्दळ पाहिली की या अंड्यांच्या गाड्या की मिनी वाईनबार? असा प्रश्न उपस्थित होतो.'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे'या प्रचलित म्हणीनुसार अंड्यापासून निर्मित विविध पदार्थांच्या शौकीनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात शहरात अंडी व अंडीजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांची संंख्या वाढली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत आमलेट पावच्या हजारांवर गाड्या आहेत. या गाड्यांवर आॅमलेट,, बॉईल फ्राय, बॉईल भुर्जी अंडाकरी आदी पदार्थांची विक्री होते. अंड्याकडे ‘स्नॅक्स’ म्हणूनही पाहिले जाते. मद्यशौकिनांना'स्टार्टर'म्हणून अंड्यांपासून निर्मित केलेला ‘मेन्यू’च आवडतो. तरुण, अल्पवयीन मुलांची गर्दीसायंंकाळ होताच हळूहळू ठिकठिकाणच्या अंडे विक्रीच्या गाड्यांवर तरुणांची गर्दी होऊ लागते. यात अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. दारु दुकानातून मद्य खरेदी करुन अंडे विक्रीच्या गाड्यांवरील पदार्थांचा निवांतपणे आस्वाद घेत मद्य प्राशन करणारी ही मंडळी पाहिली की अंगावर शहारे येतात. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व्हायलाच हवी.