शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात बुध ग्रहाचे ‘अधिक्रमण’

By admin | Updated: December 10, 2015 00:18 IST

नवीन वर्षात ९ मे रोजी बुध ग्रहाचे ‘अधिक्रमण’ होण्याची अनोखी खगोलीय घटना घडणार आहे. बुध आणि शुक्र ग्रह सूर्याच्या बाजूला असल्यामुळे यांचे अधिक्रमण होत असते.

अभ्यासकांना पर्वणी : ९ मे रोज घडणार अनोखी खगोलीय घटना अमरावती : नवीन वर्षात ९ मे रोजी बुध ग्रहाचे ‘अधिक्रमण’ होण्याची अनोखी खगोलीय घटना घडणार आहे. बुध आणि शुक्र ग्रह सूर्याच्या बाजूला असल्यामुळे यांचे अधिक्रमण होत असते.या घटना दुर्मिळ असतात व खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी ठरतात.यापूर्वी बुधाचे अधिक्रमण १ नोव्हेंबर १९९९, ७ मे २००३ व ८ मे २००६ वर्षी झाले होते. यापुढे ते ११ नोव्हेंबर २०१९, १३ नोव्हेंबर २०३२ व ७ नोव्हेंबर २०३९ वर्षी होणार आहे. यावेळी ग्रहाचा आकार व सूर्यापासूनचे अंतर इत्यादींबाबत गणिते मांडून निश्चित आकडेवारी मिळविली जाते. ही घटना पाहण्यासाठी सूर्याकडे पहावे लागत असल्यामुळे सुरक्षित सोलर चष्मे वापरणे आवश्यक आहे. अधिक्रमण म्हणजे काय? नववर्षात ९ मे रोजी सूर्य बिंबावरुन बुध ग्रहाचा एक ठिपका सरकत जाताना दिसणार आहे. याला खगोलीय भाषेत ‘अधिग्रहण’ म्हणतात. जेव्हा सूर्य, बुध व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमिवर बुध ग्रहाचा ठिपका सरकताना दिसतो. हा एक ग्रहणाचाच प्रकार आहे. परंतु बुध ग्रह पृथ्वीपासून लांब असल्यामुळे त्याचा आकार छोटा दिसतो. त्यामुळे तो सूर्यबिंबाला झाकू शकत नाही. म्हणूनच या घटनेला ‘अधिक्रमण’ म्हणतात.