शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५२ वाघ, २२ बछडे अन् १४७ बिबट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 11:00 AM

राज्यातील पहिल्या प्रकल्पात वाघांच्या प्रजनन वाढीसाठी अन्य वन्यजीवांचे संवर्धन

अमरावती : दऱ्या, खोऱ्यात विसावलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची ५० व्या वर्षांकडे वाटचाल सुरू झाली आहे. या व्याघ्र प्रकल्पात ५२ वाघ, २२ छावे आणि १४७ बिबट असल्याची नोंद गतवर्षी झालेल्या वन्यजीव गणनेनंतर करण्यात आली आहे. रानगवा, हरीण, काळवीट, रानडुकरांचे अधिवास वाघांच्या प्रजननासाठी पोषक ठरणारे आहे.

विदर्भात मेळघाट, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य तर सह्याद्री हा पश्चिम महाराष्ट्रात आहे. देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वात मोठा आणि राज्यातील पहिल्या या व्याघ्र प्रकल्पाने यशस्वी वाटचालीची ४९ वर्षे पूर्ण केली असून पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. २२ फेब्रुवारी १९७४ ला अस्तित्वात आलेला हा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननास व वास्तव्यास अनुकूल ठरला आहे. मेळघाटवर व्याघ्र प्रकल्पाचे एक छत्री नियंत्रण असून मेळघाट वाघांसह अन्य वन्यजीवांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे. व्याघ्र संवर्धनात स्थिरावलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर आहे. यात ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे. एका वाघाला साधारणतः २५चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. या अनुषंगाने मेळघाटात शंभराहून अधिक वाघ वास्तव्य करू शकतात, अशी रचना आहे.

मेळघाटात रानगवा संख्यावाढीवर संशोधन

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि बिबट्याच्या प्रजनन वाढीसाठी त्यांना आवश्यक खाद्य मिळत आहे. यात रानगवा आघाडीवर आहे. काळवीट, हरीण, सांबर, रानडुकरांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रानगव्याची सर्वाधिक प्रजनन संख्या आहे. मेळघाटात रानगवा वाढीच्या कारणमीमांसेविषयी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्राचार्य बेग हे संशोधन करीत आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सुमारे ५२ वाघ, २२ छावे आणि १४७ च्यावर बिबट आहे. इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पोषक वातावरण आहे. जंगल सफारीने पर्यटनात भर घातली आहे. निसर्ग सौंदर्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प नटला असून वनौषधी, विविध जातीचे वृक्ष, सरपटणारे प्राणी, दुर्मीळ घुबडाची नोंद येथे करण्यात आली आहे.

- मनाेजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, मेळघाट क्राईम सेल

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पTigerवाघleopardबिबट्याforestजंगलAmravatiअमरावती