शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील नियोजन समितीची बैठक अखेर रद्द

By admin | Updated: August 25, 2014 23:42 IST

नियोजन ठरविणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २६ आॅगस्ट रोजी मुंबईत बोलाविले होती.

अमरावती : नियोजन ठरविणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २६ आॅगस्ट रोजी मुंबईत बोलाविले होती. मात्र ही बैठक नियमबाह्य असल्याचा आक्षेप समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विरोधकांनी नोंदविताच अखेर विरोधकांपुढे नमती घेत ऐनवेळी जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्याची नामुष्की पालकमंत्र्यावर ओढविली आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला मागील काही महिन्यांपासून ब्रेक लागला होता. जिल्ह्याची विकासकामे निवडणुकीपूर्वी मार्गी लागावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक मुंबई मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता बोलविण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मार्गी लागावीत यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला या बैठकीच्या आयोजनाची माहिती दूरध्वनी संदेशाव्दारे दिली होती. पालकमंत्र्यांचा संदेश शिरोधार्थ मानून जिल्हा नियोजन विभागाने बैठकीची सर्व तयारीदेखील केली अन् समितीच्या सर्व सदस्यांना निमंत्रण अन् बैठकीच्या माहितीसह प्रोसिडींगची प्रतही देण्यात आली. अशातच जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेल्या काही विरोधी पक्षाच्या सदस्य सुधीर सूर्यवंशी, सतीश हाडोळ व अन्य काही सहकाऱ्यांनी दरम्यान समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना लेखी स्वरूपात पत्र दिले. या पत्रात महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) नियम १९९९चे कलम ४ (१) अन्वये समितीच्या सर्व सभा संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेतली जातील, अशी तरतुद आहे. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी होऊ घातलेली मुंबई येथील नियोजन समीतीची सभा नियमबाह्य आहे. शासनाच्या नियमात अशी तरतूद असतानाही ही सभा कुठल्या आधारे मुंबईत बोलविण्यात आली याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव यांनी याबाबत लेखी स्वरूपात मते द्यावी, असे पत्र दिले एवढेच नव्हेतर तातडीने पत्र मिळताच या मुद्दावर न्यायालयात धाव घेण्याचेही पत्रात नमूद असल्यामुळे शासनाच्या पायाखालची वाळू सरकू लागली.दरम्यान ही बाब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली असता पालमंत्र्यांचीही मोठी अडचण झाली. अखेर पालमंत्री विखे पाटील यांना विरोधकांनपुढे नमती घेत मुंबईतील ही बैठक रद्द करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला. पालमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे विरोधकांनी दिलेली मोठी चपराक असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.