शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या हत्तीघाट-बुरडघाट परिसरात भीषण आग; वनविभागाचे वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:10 IST

Amravati : मेळघाटव्याप्त हत्तीघाट आणि बुरडघाट परिसरातील वनक्षेत्रात सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच खोज संस्थेचे अॅड. बंड्या साने यांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधला, मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटव्याप्त हत्तीघाट आणि बुरडघाट परिसरातील वनक्षेत्रात सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच खोज संस्थेचे अॅड. बंड्या साने यांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधला, मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर साने यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर यंत्रणा जागी झाली आणि रात्री उशिरापर्यंत वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

सोमवारी दुपारच्या सुमारास हत्तीघाट आणि बुरडघाट परिसरातील डोंगरावरून धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. अॅड. बंड्या साने यांनी या भीषण आगीबाबत वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर वारंवार कॉल केला. मात्र, तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर साने यांच्या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आणि क्षेत्रीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

प्रशासकीय हालचालींना वेग

वनाधिकारी जयोती बॅनर्जी आणि विभागीय वन अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून परिस्थितीचा आढावा घेतला. हे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारीत येते. मात्र, वनसंपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी रात्रीच घटनास्थळी खाना झाल्याचे सांगण्यात आले. जंगलात लागलेली आग महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात पसरत असल्याने दोन्ही राज्यांच्या वनविभागाकडून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जात आहेत.

"हत्तीघाट, बुरडघाट परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलात आग दिसून आली. टोल फ्रीवर प्रतिसद मिळाला नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी कर्मचारी रवाना करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले."- अॅड. बंड्या साने, खोज संस्था, परतवाडा 

English
हिंदी सारांश
Web Title : Major Fire Engulfs Melghat's Hatti Ghat; Forest Dept Efforts On.

Web Summary : A massive fire broke out in the Hatti Ghat and Burad Ghat forest areas of Melghat. Prompt action by forest officials and regional staff contained the blaze, preventing further damage to forest property. Joint efforts with Madhya Pradesh are underway.
टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलfireआगChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावती