शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या दोन संचालकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 00:24 IST

मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अंजनगाव बाजार समितीत नाफेड तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा बांध रविवारी फुटला.

संभाजी ब्रिगेड आक्रमक : सातबारा शेतकऱ्यांचा, तूर व्यापाऱ्यांचीअंजनगाव सुर्जी : मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अंजनगाव बाजार समितीत नाफेड तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा बांध रविवारी फुटला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने बाजार समितीच्या दोन संचालकांना चोप दिल्याने बाजार समितीतील तूर खरेदीचा प्रश्न पेटला. बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या तुरीचे भाव पडल्यानंतर अंजनगाव सुर्जी येथे नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येऊन पाच हजार ५० रुपये शेतकऱ्याच्या तुरीला भाव मिळू लागला. परंतु, काही अवघ्या दिवसात नाफेड खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर येऊन पडल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे वजन व्हायला पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने अधिकारी व कर्मचारी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून आपल्या मालाचे वजन लवकर करून घेतात, अशी आरडाओरड होवू लागली. तसेच संचालक मंडळातील काही संचालकसुद्धा अंजनगाव बाजार समितीत तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कमी दराने तर खरेदी करून नाफेडमध्ये तूर विकत असल्याची ओरड मागील एक महिन्यापासून होत असताना सचिव व प्रशासक, संचालक मंडळाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप होत असताना चक्काजाम आंदोलन, निवेदने असे प्रकार चालू असताना तूर खरेदी केंद्रावर कोणत्याही सुधारणा न झाल्याने अखेर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सचिन नवघरे यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बोलणी सुरू असताना बाजार समितीचे संचालक अरुण खारोडे, नंदकिशोर काळे हे आंदोलन शांत करण्यास गेले असता त्यांच्यात बाचाबाची होऊन संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संचालकांना चोप दिला. त्यानंतर पोलिसांना पाचरण करावे लागले. तसेच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी बाजार समितीत उपस्थित झाले. त्यानंतर संभाजी ब्रिगेड व सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बाजार समितीच्या प्रत्येक गेटवर चोवीस तास शेतमाल पाहून शेतकऱ्यांना टोकण देण्यात येईल, तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तीन दिवसात सुरू करण्यात येईल, व्यापारी, अडते, संचालक यांनी प्रमाणाबाहेर नाफेड शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केल्या असल्यास त्यांच्यावर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, ही आश्वासने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये विनोद हागोणे, सोपान साबळे, पे्रमकुमार बोके, सागर बोबडे, उमेश काकड उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)