शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपयोगी साहित्याची बाजारात रेलचेल

By admin | Updated: January 9, 2016 00:35 IST

एकेकाळी गुरांचे चांदूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील बाजारपेठेत आता शेतीपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे.

शेतमजूर, शेतकऱ्यांचा वाढता ओढा : डाले, टोपले, गुरांचे साहित्य, बैलबंडीचे सुटे भागचांदूरबाजार : एकेकाळी गुरांचे चांदूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील बाजारपेठेत आता शेतीपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्यामुळे आता शहराची गुरांचे चांदूर ही ओळख लोप पावत चालली आहे. पूर्वी साखरेच्या तुलनेत गुळाचे भाव बरेच कमी होेते. त्यामुळे शेतमजूर आणि गरीब वर्ग गुळाचाच वापर करीत होते. अलिकडच्या काळात गुळाचे भाव साखरेच्या तुलनेत वधारले आहेत. त्यामुळे गूळ खरेदी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. गूळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. चांदूरबाजार तालुक्याची जमीन सुपीक असून बागायतदारांचा तालुका म्हणूनही या भागाकडे पाहिले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात ओलिताची शेती असल्याने शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता दिसून येते. त्यामुळे शेतपयोगी साहित्याला आता बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या भागात कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू, संत्री ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. सध्या शहरातील शिवाजी चौकात गाय, बैल, म्हशीच्या गळ्यातील घंटा, खुरपे, विळे, कुऱ्हाडी, बैलगाडीसाठी लागणारे साहित्य असलेली दुकाने थाटलेली दिसून येतात. हे साहित्य लोहार समाजातील काही कुटुंब विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. पूर्वी शेतकऱ्यांना हे साहित्य खरेदी करण्याकरिता रविवारच्या आठवडी बाजाराची वाट पहावी लागत असे. आता मात्र हे साहित्य येथे केव्हाही उपलब्ध होते. औद्योगिकीकरणाच्या लाटेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. आधुनिकीकरणाच्या लाटेमध्ये पारंपरिक व्यवसाय भरडले जात आहेत. अनेक ग्रामीण कारागिरांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. वेताच्या काठ्या आणि कळकापासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्या, डाले काळाच्या ओघात दिसेनासे झाले. आता प्लास्टिकच्या डाले टोपल्यांचे दिवस असून हे डाले टोपले येथील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. (तालुका प्रतिनिधी)