शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील मराठी तरूणाईने अभिनय क्षेत्रात यावे

By admin | Updated: May 11, 2015 23:57 IST

वऱ्हाडातील तरूणांना अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी फारसे व्यासपीठ मिळत नाही. परंतु येथील तरूणाई मोठी गुणी आहे.

मुलाखत : आदिवासींसाठी कार्य करण्याची रसिका धामणकरची इच्छासंदीप मानकर अमरावतीवऱ्हाडातील तरूणांना अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी फारसे व्यासपीठ मिळत नाही. परंतु येथील तरूणाई मोठी गुणी आहे. विपरीत स्थिती असली तरी वऱ्हाडातील तरूणाईने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अभिनयक्षेत्रात करिअर करावे, असे प्रतिपादन मराठमोळी अभिनेत्री व वहिनीसाहेब मालिका फेम रसिका धामणकर हिने केले. शनिवारी अभिनेत्री रसिका धामणकर एका खासगी कार्यक्रमाकरिता अंबानगरीत आली असता तिने ‘लोकमत’ प्रतिनिधीसोबत संवाद साधला. रसिका ही उच्चविद्याविभूषित आहे. तिने आतापर्यंत वहिनीसाहेब, अनोळखी दिशा, भाग्यलक्ष्मी, होणार सून मी या घरची, लक्ष्य, सीआयडी, क्राईम पॅट्रोल यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून अभिनय केला आहे. पुढे बोलताना रसिका म्हणाली, ‘आदिवासी भागात एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्यांचे जीवनमान अनुभवले आहे. मूलभूत सुख-सुविधांपासून वंचित राहून आदिवासी कसेबसे जीवन जगतात. मुंबईत आमचा खंडारबोल्ड नावाचा ५० जणांचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आदिवासींची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा आहे.’ रसिका ही मूळची वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथील रविहासी. तिने इतिहासात एमए केले आहे. तर भोपाळ येथील खैरागड विद्यापीठातून तिने संगीताची पदवी घेतली. छिंदवाडा येथे इंडियन नेव्हीत कार्यरत विजय धामणकर हे रसिकाचे पती. सध्या रसिका ही मुंबईतील वाशी येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अभिनय क्षेत्रातही काम करते आहे. रसिका म्हणते की तिला संगीतक्षेत्रात करिअर करायचे होते. पण अनवधानाने अभिनयाकडे वळले. अंबानगरीबद्दल बोलताना ती म्हणाली की, तिला अंबानगरीचे विशेष आकर्षण आहे. येथील लोक फार प्रेमळ असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. भविष्यात संधी मिळाली तर चिखलदरा, मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रपट करणे आवडेल.