शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळच्या शिक्षकाने मांडली अध्यापनाची नवी संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST

नवतंत्रज्ञानाच्या वापराने पाठ्यपुस्तके बनली स्मार्ट संजय जेवडे - नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक ...

नवतंत्रज्ञानाच्या वापराने पाठ्यपुस्तके बनली स्मार्ट

संजय जेवडे - नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अंकुश जगन गावंडे या शिक्षकाने अध्यापनाची नवी संकल्पना शिक्षण क्षेत्रात मांडली. त्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तके स्मार्ट बनविली. त्यांनी ‘अभ्यास कट्टा’ निर्माण करून एक अनोखा उपक्रम सुरू केला. गावात भिंतीला अभ्यासाचे फ्लेक्स लावले. त्यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अभ्यास करता येईल, अशी रचना करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांना व्हिडिओ व ॲपद्वारे अभ्यास करता येतो. यासाठी त्यांनी क्यूआर कोड व ॲप बनविले. ते त्या पोस्टवर लावले.

विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर केला जात आहे.

अंकुश गावंडे यांनी स्वतःची पाठ्यपुस्तके ऑग्मेंटिक रिॲलिटी चित्रयुक्त बनवलेली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून चार वर्षांपासून ते अध्यापन करतात. त्यांना नुकताच पुरस्कारही प्राप्त झाला. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन केंद्रप्रमुख विलास राठोड यांनी भेट दिली आणि तालुक्यातील सालोड व धानोरा गुरव या दोन केंद्रांमध्ये असलेल्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य या उपक्रमाला लाभले.

--------------

काय आहे ऑग्मेंटिक रिॲलिटी?

ऑग्मेंटिक रिॲलिटी असे तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे आभासी वातावरण निर्मित होते. विविध प्रकारच्या घटकांसाठी ऑग्मेंटिक रिॲलिटीवर आधारित चित्रे व मोबाईलचा वापर करून शिकविण्यासाठी अंकुश गावंडे यांनी वेगवेगळ्या मोबाईल ॲपचा वापर केला. विशिष्ट प्रकारच्या ऑग्मेंटिक रिॲलिटीवर आधारित चित्राचे संकलन केले तसेच स्वतःसुद्धा ऑग्मेंटिक रिॲलिटी ॲपची निर्मिती केली.

------------

विद्यार्थ्यांना या अध्यापनामुळे विषयाची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. शाळेत येण्याची ओढ निर्माण होते. शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन विद्यार्थी वाचनाकडे आकर्षित होऊन अध्ययन निष्पत्ती पूर्ण होण्यास मदत होते.

- अंकुश गावंडे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगरूळ चव्हाळा

-------------

अंकुश गावंडे यांचा उपक्रम स्तुत्य आहे. कोरोनामुळे वर्ग बंद असले तरी या द्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू ठेवता येते. तालुक्यातील सर्व केंद्रांतील शाळेत हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षक व शिक्षकमित्र यांच्या सहभागातून नियोजन केले आहे.

- कल्पना ठाकरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नांदगाव खंडेश्वर