शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूच निघाला दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरविले. सायंकाळी घरात कोणीही नसताना समीर अन्य फरार असलेला आरोपींसह  महिलेच्या घरात लपवून बसला; तर मोहम्मद आवेश व  फरार असलेला दुसरा  आरोपी घरावर पाळत ठेवून होता. मात्र महिला अचानक घरात आली. तिने आरोपीला बघताच आरडाओरड केल्याने त्यांनी महिलेचे हात बांधले. त्यानंतर घरातील सर्व सोने व पैसे काढले. मात्र अचानक महिलेचे पती घरी येऊन त्यांनीही  आरडाओरड केली. 

ठळक मुद्देमाधवनगरातील दरोडा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरात दोन वर्षे भाडेकरू म्हणून राहिलेल्या आरोपीने इतर तिघांना सोबत घेऊन  राजापेठ ठाणे हद्दीतील माधवनगर येथे दरोडा टाकला. बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून, पतिपत्नीचे  हातपाय बांधून त्यांनी घरातील तीन लाख ८६  हजार रुपयांचे  सोने व पैसे पळविले. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून दोघांना बुधवारी अटक केली. घरात दोन वर्षांपासून राहणाऱ्या भाडेकरूच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपास पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. आरोपी दोन वर्षांपासून मातणे परिवाराच्या घरात  पाळत ठेवून होता. त्यानंतर त्याने त्या परिवाराची खडान‌्खडा माहिती घेऊन सदर गुन्हा पूर्णत्वास नेला. मुख्य सूत्रधार आरोपी समीर शहा नजीर शहा (वय २६) याला अंबाळा, ता. मोर्शी येथून पथकाने ताब्यात घेतले; तर त्याचा साथीदार मोहम्मद आरिफ (३०, रा.  गवळीपुरा) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.  समीर हा फिर्यादी शुभांगी  मातणे  यांच्या घरी वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होता. त्याला शुभांगी यांचे पती हे सुवर्णकार असल्याची माहिती होती. त्यामुळे त्याच्यासह इतर तिघाजणांनी दरोड्याचा प्लॅन रचला.  ७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरविले. सायंकाळी घरात कोणीही नसताना समीर अन्य फरार असलेला आरोपींसह  महिलेच्या घरात लपवून बसला; तर मोहम्मद आवेश व  फरार असलेला दुसरा  आरोपी घरावर पाळत ठेवून होता. मात्र महिला अचानक घरात आली. तिने आरोपीला बघताच आरडाओरड केल्याने त्यांनी महिलेचे हात बांधले. त्यानंतर घरातील सर्व सोने व पैसे काढले. मात्र अचानक महिलेचे पती घरी येऊन त्यांनीही  आरडाओरड केली. बिंग फुटल्याचे लक्षात येताच दोघांनी  महिलेवर व पतीवर चाकूचा वार करून, तसेच बंदुकीचा धाक दाखवून चारही आरोपींनी घटनास्थळावरून  पळ काढला. पळ काढत असताना एक दुचाकीचालक आडवा आल्याने   त्यांनी दुचाकीचालकाला फिल्मी स्टाईल खाली पाडून हवेत दोन गोळ्या झाडल्या.

समीरविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हेसमीर हा आधीच गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाने दिली आहे. त्याच्यावर नागपूर,  चांदूर बाजार व नांदगाव पेठ येथे बॅग लिफ्टिंग  प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तो  ओळख लपवून  महिलेच्या घरी भाड्याने राहत होता. 

फरार आरोपीवरही गुन्हे दाखलदरोडा प्रकरणातील एका फरार आरोपीवरसुद्धा काही पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत; तर अन्य एक आरोपी हा इतर राज्यातील असल्याने शोधपथक त्याचा शोध घेत आहे.  फरार असलेल्या ३३ वर्षीय  आरोपीने हवेत दोन बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.

पाच महिन्यापूर्वीच मुख्य आरोपीचा सुगावाघटनेनंतर जेव्हा तपासाची सूत्रे हलविली तेव्हा समीर हाच मुख्य आरोपी असल्याचे पाच महिन्यांपूर्वीच कळले होते. मात्र तोे हाती लागत नव्हता. त्यानंतर मात्र गोपनीय माहिती घेऊन दोघांना ताब्यात घेतले. आणखी दोघांना अटक करू व त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करू, पोलीस आयुक्त आरती सिंह म्हणाल्या.

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस