शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

महेंद्रीचे विश्रामगृह झाले १०८ वर्षांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 5:00 AM

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर तालुक्यातील महेंद्री येथील विश्रामगृह आहे. त्या काळात या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण राहावे, याकरिता दगडांमध्ये भिंती बांधण्यात आल्या असल्या तरी वरचे छत गवताचे होते.

ठळक मुद्देबेदखल : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाताहत, ऐतिहासिक वास्तू जपण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : येथून २० किमी अंतरावर असलेल्या महेंद्री येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृहाला १०८ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू डौलात उभी असली तरी पुरेशा डागडुजीअभावी तिला घरघर लागली आहे. वनविभागाने या विश्रामगृहाकडे दुर्लक्ष चालविले आहे. ब्रिटिशांनी सन १९१२ मध्ये या विश्रामगृहाची उभारणी विदेशी पाहुण्यांच्या निवासाकरिता केली होती.महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर तालुक्यातील महेंद्री येथील विश्रामगृह आहे. त्या काळात या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण राहावे, याकरिता दगडांमध्ये भिंती बांधण्यात आल्या असल्या तरी वरचे छत गवताचे होते. वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना तसेच पाहुण्यांना हवा मिळावी म्हणून दोराने हलणारा पंखा आणि ते हलविणारा माणूस असायचा. प्रकाशाकरिता कंदील होते. महेंद्री टेकडीवर अमरावती-पांढुर्णा राज्य महामार्गाच्या बाजूलाच हे विश्रामगृह साकारण्यात आले आहे.टेकडीवर असल्याने येथून सभोवतालच्या हालचाली माहिती पडायच्या. शत्रूसुद्धा पोहोचू शकत नव्हता. येथे दोन शयनकक्ष, एक माजघर, एक भोजनकक्ष तसेच खानसामा आणि चौकीदाराचेसुद्धा निवासस्थान आहे. संपूर्ण बांधकाम दगडी आहे. सभोवताल दाट जंगल आणि बाजूच्या टेकडीवर महेंद्री हे छोटेसे २० घरांचे गाव आहे.विश्रामगृहाची देखभाल वरूड वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून केली जाते. वनविभागाने लक्ष देऊन विश्रामगृहाची ऐतिहासिक वास्तू जपण्याची मागणी निसर्गप्रेमी संस्थांकडून केली जात आहे.इको-टुरिझमचा प्रस्ताव धूळखातसात-आठ वर्षांआधी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी इको-टुरिझमचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला. मात्र, अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. त्या प्रस्तावास शासनाने हिरवी झेंडी दिल्यास पर्यटकांची संख्या वाढून उत्पन्नात भर पडेल. मात्र, त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. येथील खानसामा सेवानिवृत्त झाल्यानंतर वास्तव्यास कोणीच नसतो. या विश्रामगृहाची फरपट थांबलेली नाही. येथे गेल्या दोन-तीन वर्षांपासून नूतनीकरणाचे काम सुरू असून, विद्युत व्यवस्था नाही. यामुळे विश्रामगृहाला अखेरची घरघर लागली आहे.सुविधांमुळे सौंदर्यात भरकाळानुरूप बदल करून येथे सन १९८७-८८ मध्ये विद्युत व्यवस्था, स्वयंचलित पंखे, कौलाचे छप्पर व सुंदर उद्यान साकारण्यात आले. येथे स्वातंत्र्यानंतर उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेतेसुद्धा वास्तव्यास असतात. महेंद्री पंढरी जंगलातून राज्य महामार्ग, जंगलातील पशू-पक्षी तसेच सांैदर्यांत भर टाकणारा वर्धा डायव्हर्शन सुपर एकसप्रेस कॅनाल आणि तीन किमी लांबीचा विलोभनीय बोगद्याचा कालवा आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, सांबर, निलगाय आदी प्राण्यांचा सततचा वावर पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक