शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

खारपाणपट्ट्यात शिंपल्यांची शेती, शेततळ्यात पिकवले मोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:46 IST

तालुका खारपाणपट्टा असून, येथील शेतकरी हा नैसर्गिक पाण्यावरच अवलंबून राहतो. मात्र, याला एक शिक्षक अपवाद ठरला आहे.

सचिन मानकर ।ऑनलाईन लोकमतदर्यापूर : तालुका खारपाणपट्टा असून, येथील शेतकरी हा नैसर्गिक पाण्यावरच अवलंबून राहतो. मात्र, याला एक शिक्षक अपवाद ठरला आहे. त्यांनी खासगी शिक्षकी पेशा साडून चक्क खारपाणपट्ट्यात अनोखा प्रयोग राबवित शिंपल्यातून मोती पिकविले आहे. मनोज ढोरे असे त्या शिक्षकांचे नाव असून, ४ ते ५ लाखांचे उत्पन्न सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.दर्यापूरहून पाच कि.मी. अंतरावर एका शेततळ्यात सहा फुटाचा खड्डा करून त्यात पर्ल फार्मिंग केले आहे. ५० हजार रूपये गुंतवून ढोरे यांनी हा प्रयोग बारविल्याचे सांगितले.१४ महिन्यांनंतर शिंपल्यावर लेअर चढल्यानंतर मोती तयार होतो. तीन इंचाच्या शिंपल्यात दोन मोती दोन, तर सहा वर्षांच्या शिंपल्यामध्ये सर्वोच्च दर्जाचे मोती तयार होऊ शकतात. यामध्ये लोमीलीडेन्स, लौमीलीटेन्स, पेरोशिया कोरूगाटा, अशा प्रजातींचे शिंपले तयार होतात. मोत्याची शेती १० बाय १० मीटरच्या सिमेंट टँकमध्येही हे शक्य आहे. डिझाईनर मोती, जसे की गणपती, गौतमबुद्ध, साईबाबांच्या मूर्ती या शिंपल्यापासून करणे शक्य आहे. असे मत ढोरे यांनी व्यक्त केले. एक एकराच्या पारंपरिक शेतीत ५० हजार रुपयापर्यंत नफा होऊ शकतो. मोत्याच्या शेतीमध्ये १० ते १२ लाखांचे उत्पन्न घेता येते. गोड पाण्यामध्ये मोती संवर्धनासह विविध योजनांचा लाभ घेऊन ६ ते ८ प्रकारे व्यवसाय करू शकतो. मोत्याची मागणी विदेशात असल्याने चांगली बाजारपेठ मिळू शकते. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आणखी मोती संवर्धन संबंधित माहितीसाठी इंडियन सेल्स पर्ल फार्मिंग सेंटर, दर्यापूर मोती फार्म आणि ट्रेनिंग सेंटर तयार करण्याचा मानस ढोरे यांनी व्यक्त केला.दर्यापूर तालुक्यात अनोखा प्रयोग : पाच लाखांचे उत्पन्नदीड हजारांपर्यंत किंमत५०० स्के. फूट तलावात ५०० शिंपल्यांपासून पर्ल फार्मिंग करण्यात येऊ शकते. पाणी ट्रिटमेंट, इन्स्टुमेंट, ईफ्रास्ट्रक्चरवर २० हजार खर्च होतो. एक मोत्याची बाजार किंमत ३०० रुपयांपासून तर १५०० रुपयापर्यंत मिळू शकते. बाजारपेठ सहज उपलब्ध होते.असा तयार होतो शिंपल्यात मोतीशिंपल्यामधून लाळ निघते. कॅल्सियम कार्बाेनेट सहित आठ प्रकारच्या पावडरपासून बनविल्या जातो. न्युक्लिअस (मोती बीज) जिवंत शिंपल्याचे दोन सेंटीमीटर तोंड उघडून त्यामध्ये न्युक्लीअस प्लॉन्ट करता येतो. ज्या आकाराची फॉरेन बॉड शिंपल्यामध्ये टाकल्या त्या डिझाईनचा मोती तयार होतो.खारपाणपट्ट्यात हा एक नवीन प्रयोग करण्याचा मानस होता. त्या दृष्टीने कामास लागून अशा प्रकारे शिपल्यांतून डिझाईनर मोत्यांची शेती करण्याचा व्यवसाय थाटला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न येणार आहे.- मनोज ढोरे,प्रयोगशील शेतकरी